Aryan Khan करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? किंग खान बोलता बोलता सांगून गेला...

Shah Rukh Khan Film: शाहरूख खानने एक सुचक वक्तव्य केलंय, ज्यावरून तो त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपल्या मुलाला उतरवू शकतो असं दिसतं.

Updated: Nov 6, 2022, 10:53 PM IST
Aryan Khan करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री? किंग खान बोलता बोलता सांगून गेला... title=

Aryan Khan Acting Debut: बॉलिवूड किंग खान म्हणजे शाहरुखने (Shah Rukh Khan) गेल्या 30 वर्षात जगभरात नाव कमावलं. 11 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा रावन (Ra.One) हा चित्रपट आला होता. मात्र, हा चित्रपट जास्त चालला नाही. अशातच आता किंग खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. त्याला कारण ठरलंय...शाहरूखचं सुचक वक्तव्य...

पुढील वर्षी शाहरुख खानचे (Shah Rukh Khan Film) तीन चित्रपट येणार आहेत. त्याची मुलगी सुहानाचाही डेब्यू चित्रपट येणार आहे. दरम्यान, शाहरुखचा मुलगा आर्यनच्या अभिनयात एन्ट्री करत असल्याची चर्चा आहे. अशातच शाहरूख खानने एक सुचक वक्तव्य केलंय, ज्यावरून तो त्याच्या एका चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आपल्या मुलाला उतरवू शकतो असं दिसतं.

अलीकडेच शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसानिमित्त (Shah Rukh Khan Birthday) सोशल मीडियावर चाहत्यांशी थेट संवाद साधला होता, त्यावेळी एका प्रश्नाला धक्कादायक उत्तर दिलं. एका चाहत्यानं शाहरुखला रावनचा सिक्वेल बनवण्याचा विचार केला आहे का?, असा प्रश्न विचारला. त्यावर किंग खानने सकारात्मक उत्तर दिलंय.

काय म्हणाला शाहरूख?

मी अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत राज कपूर (Raj kapoor) साहेबांना असं म्हणताना ऐकलं होतं की, जो मुलगा कलात्मकदृष्या मजबूत नाही, ज्याला लोक बघत नाहीत, ते जास्त प्रेमळ असतात. ते सर्व चित्रपट जे लोकांना आवडले नाहीत, असं शाहरूख म्हणालाय. मला वाटतं की, रावन चित्रपटात (Ra.One Movie) जीवनची भूमिका साकारण्यासाठी एखादा नवा आणि तरुण चेहरा मिळाला तर नक्कीच मी सिक्वेल बनवू शकेन, असंही शाहरूख म्हणाला आहे.

आणखी वाचा- Aryan Khan Drugs Case : तुरूंगात कैदी-नातेवाईकाची भेट नक्की होते तरी कशी?

दरम्यान, शाहरूखच्या या वक्तव्यामुळे, तो Ra.One च्या सिक्वेलमधून त्याचा मुलगा आर्यन खानच्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन खान सर्वांच्या नजरेत आला होता. त्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे.