पवनदीपच्या घरी लग्नाचा थाटमाट, अरुणिताही दिसली मंडपात, व्हिडिओ व्हायरल

दोघांनी एकत्र पोज दिली.

Updated: Feb 9, 2022, 07:49 PM IST
पवनदीपच्या घरी लग्नाचा थाटमाट, अरुणिताही दिसली मंडपात, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : इंडियन आयडॉल 12 चा विजेता पवनदीप राजनच्या बहिणीच्या लग्नात अरुणिता कांजीलालही पोहोचली होती. त्यांच्या फॅन पेजवर लग्न समारंभाचे फोटो व्हायरल होत आहेत. उत्तराखंडमध्ये पवनदीपची बहिण चांदनीचं लग्न होतं.

यावेळी अरुणिता तिथे पोहोचली आणि लग्नाच्या सर्व विधींमध्ये भाग घेतला. ती वधूसोबत सर्वत्र ठळकपणे दिसली. हळदी समारंभात पवनदीपच्या बहिणीने अरुणितालाही हळद लावली आणि एकत्र पोज दिली.

पवनदीप जेव्हा संगीत समारंभात परफॉर्मन्स करत होता, तेव्हा अरुणिताही त्याच्यासोबत होती. लग्नाच्या फंक्शनचे व्हिडिओ त्याच्या चाहत्यांकडून खूप पसंत केले जात आहेत.

अरुणिता कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे तेथे रमली होती. पवनदीप राजनची बहीण चांदनी हिचे लग्न तिच्या गावी चंपावत येथे झाले होते. यावेळी त्याची जवळची मैत्रीण अरुणिता कांजीलालही पोहोचली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरुणिताचे बॉन्डिंग पवनदीपच्या कुटुंबाशीही आहे. त्याची बहीण ज्योती ही देखील अरुणिताची मैत्रिण आहे.

अरुणिताने कुटुंबातील सदस्य म्हणून लग्नाच्या विधींमध्ये भाग घेतला. हळदीच्या वेळी ती पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली होती. तिने पवनदीपच्या बहिणीला हळद लावली. दोघांनी एकत्र पोज दिली.