सर्व मातांसाठी सलमानची बहिण अर्पिताचा हृदयस्पर्शी संदेश...

 बॉलिवूडचा सूपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माने जगभरातील सर्व मातांसाठी एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट केला आहे. 

Updated: Mar 27, 2018, 03:22 PM IST
सर्व मातांसाठी सलमानची बहिण अर्पिताचा हृदयस्पर्शी संदेश... title=

मुंबई : बॉलिवूडचा सूपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्माने जगभरातील सर्व मातांसाठी एक हृदयस्पर्शी संदेश पोस्ट केला आहे. मातृत्वाबद्दलचे विचार व्यक्त करत अर्पिताने तिची आईची भूमिका आणि मातृत्वाचा अनुभव शेअर केला आहे.

मातृत्वाचा अनुभव केला शेअर

आपल्या या पोस्टच्या माध्यमातून अर्पिताने सर्व मातांना आपला अनुभव शेअर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर आई आणि बाळाच्या अद्भूत नात्याने तिला एक चांगली आई बनण्यास मदत केली आहे.

Arpita Sharma

नक्की काय आहे हा उपक्रम?

एकमेकांना साहाय्य आणि शक्ती प्रदान करण्याचा आग्रह अर्पिता आपल्या संदेशातून प्रत्येक मातेला करत आहे. आपली कहानी लिहून बाकी मातांना, महिलांना मदत करा. अर्पिताच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. या उपक्रमामागील उद्देश नक्की काय आहे, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

चाहत्यांच्या उत्सुकतेला अर्पिताचे उत्तर

या जिज्ञासाचे उत्तर देताना अर्पिताने लिहिले की, मी आताच सर्व सांगितले तर मज्जा उरणार नाही. तुम्ही तुमचा अनुभव लिहा आणि मला पाठवा. मग तुमचा अनुभव प्रदर्शित केला जाईल की नाही, हे ही तुम्हाला समजेल. मी तुमच्यी कहाण्या वाचण्यासाठी उत्सुक आहे.

गुपित गुलदस्तातच

अर्पिताच्या या हृदयस्पर्शी पोस्टमध्ये नक्कीच काही ना काही गुपित दडलेले आहे.