'जर विचारच घाणेरडा केला... ', गरोदरपणातील फोटोशूटवर धर्मावरून टीका होताच अभिनेत्रीचा संताप

'रस्त्यावर एखादी गरोदर महिला दिसली तर...', गरोदरपणातील फोटोशूटवर धर्मावरून टीका होताच अभिनेत्रीचा संताप  

Updated: Dec 5, 2022, 03:47 PM IST
'जर विचारच घाणेरडा केला... ', गरोदरपणातील फोटोशूटवर धर्मावरून टीका होताच अभिनेत्रीचा संताप title=

Armeena Rana Khan: आई होणार असल्याचा आनंद प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्या गरोदरपणातील पहिल्या दिवसापासून दिसत असतो. आपल्या आयुष्यात नवीन पाहुणा येणार आहे, ही भावनाच मुळात खास असते. पण याच भावनेला कोणी गालबोट लावला तर होणाऱ्या आईचा संताप वाढतो. पाकिस्तानमधील अभिनेत्रीला या गोष्टीचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री अरमीना राणा खानने (Armeena Rana Khan) इन्स्टाग्रामवर प्रेग्नेंसी फोटोशूट पोस्ट केलं. अभिनेत्रीने प्रेग्नेंसी फोटोशूट केल्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (armeena khan networth)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पण अभिनेत्री इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. पहिल्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने 'ज्या लोकांना त्रास झाला आहे, त्यांना मी प्रामाणीकपणे सांगते मला प्रचंड हसायला येत आहे.' असं म्हणत अभिनेत्रीने #Bandars आणि #Bandarinas असं लिहिलं आहे. 

तर दुसऱ्यापोस्टमध्ये अभिनेत्रीने, 'बंधू आणि भगिनींनो हा विमानतळ नाही, त्यामुळे तुम्ही येण्याची आणि जाण्याची सर्व माहिती देण्याची बिलकूल गरज नाही... आभार...' सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Armeena Rana Khan on her pregnancy photoshoot)

पुढे अभिनेत्री म्हणाली, '21 व्या शतकात देखील काही गोष्टी धर्माशी जोडल्या जातात. जेव्हा रस्त्यावर एखादी गरोदर महिला दिसली तर तुम्ही नजर चोरता की मोठा चष्मा लावता... ही अशी टीका होत असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे...' असं म्हणत अभिनेत्री टीका करणाऱ्यांना खडसावलं... (armeena rana khan latest photo)

वाचा | कतरिनाला सोडून Vicky Kaushal चा मराठमोळ्या श्रेया बुगडेसोबत रोमँटिक अंदाज

 

पण अभिनेत्रीने शेवटच्या पोस्टमध्ये पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत. 'खरं सांगायचं झालं तर माझ्याकडे तुमच्या प्रेमा शिवाय दुसरं काहीही नाही. ट्रोलर्स फेक अकाउंटवरुन कमेंट करत आहेत. पण आता मी माझ्या हितचिंतकांवर जास्त लक्ष देणार आहे...' (armeena khan husband name)