दोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Armaan Malik Workout Video with New girl :  अरमान मलिकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी तिसऱ्या पत्नीची तयारी करतोयस का असा सवाल देखील केला आहे.

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2023, 06:18 PM IST
दोघी असताना तिसऱ्या पत्नीची तयारी? अरमान मलिकचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली title=
(Photo Credit : Social Media)

Armaan Malik Workout Video with New girl : लोकप्रिय युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अरमान मलिक हा नेहमीच त्याच्या दोन पत्नींमुळे चर्चेचा विषय ठरतो. त्याच्या दोन्ही पत्नीनं बाळाला जन्म दिला असून तो आता चार मुलांचा वडील झाला आहे. अरमान मलिक हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहणारा अरमान आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. अरमानचा एका मुलीसोबतचा जीममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे तो तिसरं लग्न करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अरमान मलिकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अरमान हा एका महिलेसोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. खरंतर, हा व्हिडीओ अरमान मलिकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत वर्कआऊटमध्ये मदत करत अरमान हेवी वर्कआऊट करण्यात खरंतर मदत करतोय. त्या दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. अरमाननं काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि ट्रॅक परिधान केली आहे. तर त्या महिलेनं काळ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि टाईट्स परिधान केली आहे. तर अनेकांना माहित नसेल की ही महिला कोण आहे? अनेक नेटकऱ्यांना हाच प्रश्न पडला आहे. तर ही महिला दुसरी कोणी नसून अरमानची जवळची मैत्रिण आणि इन्फ्लुएन्सर निष्ठा मिड्डा आहे. नेटकऱ्यांचे लक्ष फक्त त्या दोघांच्या वर्कआऊटनं नाही तर त्या दोघांमध्ये असलेल्या केमिस्ट्रीनं वेधलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न                                                                                                                                                                                                     

अरमानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी अरमानची खिल्ली उडवली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की असं वाटतंय की तिसऱ्या पत्नीची तयारी सुरु आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की, मी आताच सांगतोय हिच्याशीपण लग्न करणार हा. तिसरा नेटकरी म्हणाला की काय मस्त जोडी आहे. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, तुला पाहून राम रहिम बाबाची आठवण येते. दुसरा त्या महिलेविषयी बोलताना म्हणाला, इतका मेकअप करून जीमला कोण जातं. तिसरा नेटकरी म्हणाला, अरमानची अपकमिंग पत्नी आहे ती. तर काही नेटकऱ्यांनी अरमानला दोन्ही पत्नीसोडून हिच्यासोबत काय वर्कआऊट करतोयस असा प्रश्न विचारला आहे.