Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडनं दिली गूड न्यूज! वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा होणार बाबा

Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades Pregnant : अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडनं ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गॅब्रिएलानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

दिक्षा पाटील | Updated: Apr 29, 2023, 05:17 PM IST
Arjun Rampal च्या गर्लफ्रेंडनं दिली गूड न्यूज! वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेता चौथ्यांदा होणार बाबा title=
(Photo Credit : Gabriella Demetriades Instagram)

Arjun Rampal Girlfriend Gabriella Demetriades Pregnant : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अर्जुन त्याची लेकीमुळे चर्चेत होता. त्याच्या लेकीनं कोणत्याही मदतीशिवाय मॉडेलिंगच्या जगात पदार्पण केलं. दरम्यान, अर्जुन रामपाल सध्या त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. गॅब्रिएलानं नुकतंच तिचं प्रेग्नंसी फोटोशूट केलं. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गॅब्रिएलानं शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

गॅब्रिएलानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये गॅब्रिएलानं डीप नेकलाइन असलेला ब्राऊन रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोमध्ये गॅब्रिएला तिचं बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत गॅब्रिएलानं हे खरं आहे की एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) ? असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. गॅब्रिएलाच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. गॅब्रिएला ही एक आफ्रिकन मॉडेल आहे. गॅब्रिएला ही सोशल मीडियावर मुलगा एरिक आणि बॉयफ्रेंड अर्जुन रामपालसोबतचे फोटो शेअर करताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अर्जुन आणि गॅब्रिएला हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अर्जुन आणि गॅब्रिएला यांना एक मुलगा आहे. त्यांचा मुलाचं नाव एरिक असून तो तीन वर्षांचा आहे. गॅब्रिएला आता दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. गॅब्रिएलानं पोस्ट शेअर करताच अर्जुन रामपालनं त्यावर कमेंट करत रेड हार्ट इमोटिकॉन शेअर केलं आहे. तिची पोस्ट पाहून अभिनेत्री अॅमी जॅकस्ननं कमेंट करत तुझ्यासाठी खूप आनंदी असल्याचं म्हटलं आहे. इतकंच काय तर तुझ्या इतक्या सुंदर कुटुंबासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. तर काजल अग्रवाल, मलायका अरोरा सारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

हेही वाचा : मराठीतल्या ब्लॉकबस्टर Sairat चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण! पोस्ट शेअर करत आकाश ठोसर म्हणाला...

अर्जुन रामपालचा घटस्फोट

अर्जुन रामपालचा पहिली पत्नी मेहेर जेसिकासोबत 2019 साली घटस्फोट झाला होता.  त्या दोघांनी 21 वर्षांचा संसार संपवत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. अर्जुन आणि मेहेरला दोन मुली आहेत. त्यांच्या मुलीची नावं महिका रामपाल, मायरा रामपाल असे आहे.  त्यानंतर अर्जुन गॅब्रिएलासोबत रिलेशनशिपमध्ये आला. तर गर्लफ्रेंड गॅब्रिएला आणि अर्जुनला एक मुलगा असून त्याचं नाव एरिक आहे. दरम्यान, वयाच्या 50 व्या वर्षा अर्जुन पुन्हा एकदा वडील होणार आहे.