या ड्रेसमुळे जान्हवी ट्रोल ; अर्जून कपूर भडकला

जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. 

Updated: Jun 7, 2018, 12:38 PM IST
या ड्रेसमुळे जान्हवी ट्रोल ; अर्जून कपूर भडकला title=

मुंबई : जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. खरंतर पावसाला सुरुवात होताच जान्हवी बॉयफ्रेंड ईशान खट्टरसोबत डिनर डेटवर गेली होती. या डिनर डेटचा दोघांचा फोटोही समोर आला होता. या फोटोत ती व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

तिचा हा व्हाईट ड्रेस शॉर्ट असल्याने लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. जान्हवी टॉपखाली पॅंट घालायला विसरली, अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर उमटू लागल्या. ट्रोलर्सने जान्हवीच्या या ड्रेसची चांगलीच खिल्ली उडवली.

ट्रोलर्सच्या या कमेंट्सवर जान्हवीचा भाऊ अर्जून कपूर मात्र चांगलाच भडकला. अर्जून नेहमीच आपल्या बहिणी अंशुला, जान्हवी आणि खुशीच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. जान्हवीच्या शॉर्ट ड्रेसची बातमी करणाऱ्या वेबसाईटवर अर्जून भडकला. त्याने ट्वीट केले की, २ ट्रोर्ल्सने या फोटोवर कमेंट केली आणि एका मोठ्या वृत्तपत्राच्या वेब टीमला ती बातमी वाटली... यांच्यासाठी टाळ्या... ही खूप वाईट आहे की मीडिया अशाप्रकारच्या ट्रोलर्संना अटेंशन देते आणि त्यानंतर त्यावर आमच्या प्रतिक्रीयांची वाट पाहते.

आपल्या बहिणीच्या बचावसाठी अर्जूनने न्यूज वेबसाईटवर ताशेरे ओढले. अर्जून नेहमीच आपल्या बहिणींचा बचाव करताना दिसला आहे.