Arjun Kapoor Reaction On Malaika Arora Pregnancy : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहे. या दोघांच्या नात्याबद्दल, लग्नाबद्दल, अनेकदा सोशल मीडियावर चर्चंना उधाण येते. त्यातच आणखी एका गोष्टीची भर पडली ती म्हणजे मलायका अरोराच्या प्रेग्नंसीची चर्चा..(Malaika Arora Pregnancy News) गेल्या दोन दिवसापासून मलायका अरोरा गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. त्यावर आता अर्जुन कपूरच्या उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर अशा वृत्तांवर त्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अर्जुन आणि मलायका (Malaika and Arjun ) अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. यामुळे दोघेही सतत चर्चेत असतात. बी-टाऊनमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. मलायकचे यापुर्वी अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानसोबत लग्न झाले होते. या दोघांना अरहान नावाचा एक मुलगाही आहे. 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून मलायका अर्जुनसोबतच आहे. तर अरबाज त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यातच आता मलायका गर्भवती असल्याच्या चर्चांवर आता अर्जून कपूरनेही प्रतिक्रीया दिली आहे.
बॉलिवुड बबल या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “नकारात्मकता खूप सहज पसरवता येते. त्यामुळे लोकांचे लक्ष फार लवकर वेधले जाते. अशा गोष्टींकडे लोक लगेच आकर्षित होतात, म्हणूनच या अफवा लवकर पसरतात. आम्ही अभिनेते आहोत, पण आमचे ही खासगी आयुष्य हे खासगी नसते. अभिनय क्षेत्रात असल्यामुळे काही प्रमाणात तुम्हाला अशा गोष्टीं खपवून घ्यावा लागतात, अशा वृत्तांमध्ये काही गोष्टींचा उल्लेख नसतो, परंतु आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यमांवर अवलंबून असतो. पण आम्हीसुद्धा माणसे आहोत, याची तुम्ही किमान तरी दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आमच्याबद्दल खूप महत्वाचे काहीतरी लिहा, एकदा तरी आमच्या सत्याची तपासून घ्या. किमान एवढे तरी करा. तुम्ही गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात, त्यांच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तुम्ही एखाद्याला खूप महत्वाची गोष्ट इतक्या सहजतेने पसरवू नये...अशी प्रतिक्रीया अर्जून कपूरने दिली आहे.
मलायकाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करताना अर्जुनने लिहिले होते, “तुम्ही सर्वात खालची पातळी गठली आहे आणि ते सुद्धा अत्यंत अनौपचारिक, असंवेदनशील आणि अनैतिक पद्धतीने तुम्ही ही बातमी दिली. हा पत्रकार सतत अशा बातम्या लिहितो आणि आम्ही फेक गॉसिप आर्टिकल्सकडे दुर्लक्ष करतो म्हणून त्याचं निभावून जाते. पण आता पुरे झाले. आमच्या खासगी आयुष्याशी खेळण्याची हिंमत करु नका, असा थेट इशारा अर्जूनने या पोस्टद्वारे दिला होता.
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. बराच काळ एकत्र राहिल्यानंतर 2017 मध्ये दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये होते. 2019 मध्येच त्यांनी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे उघडपणे सांगितले.