Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का

Arijit Singh च्या एका Concert चं तिकिट ऐकून तुम्ही म्हणाल, नाही गेलेलंच बरं....  

Updated: Nov 27, 2022, 06:35 PM IST
Arijit Singh च्या एका कॉन्सर्टसाठी मोजावे लागत आहेत इतके पैसे; एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का  title=
Arijit Singh pune concert costs 16 lakh so much You will be shocked to hear the price of a ticket nz

Arijit Singh: अरिजित सिंग (Arijit Singh) चे भारतातच (India) नाही तर परदेशातही अनेक चाहते आहेत. त्यांने त्याच्या गाण्याने अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. त्यानं त्याच्या सुपरहिट गाण्यांनी (Superhit Songs) स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडचा (Bollywood) सर्वोत्कृष्ट गायक अरिजित सिंग हे संगीतातील सर्वात मोठे नाव बनले आहे. आज सगळ्याच हिट चित्रपटांमध्ये (Hit Movies) अरिजित सिंगच्या गाण्यांना मागणी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वानाच त्याच्या गाण्यांचे क्रेझ (Craz) आहे.  इतकंच नाही तर अरिजितच्या कॉन्सर्टमध्ये (Concert) प्रचंड गर्दी असते. चाहत्यांचे प्रेम मिळवण्याबरोबरच, हिटमेकरने त्याच्या गाण्यांनी पैसे देखील कमावले आहेत. 

केवळ चित्रपटच नाही तर अरिजितला जगभरातील लाइव्ह गिग्समध्येही त्याचा वाटा मिळतो. सिंगरने 2019 च्या फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 यादीतही (Forbes India Celebrity 100 List) स्थान मिळवले आहे. कधी कधी  अरिजित सिंग काही कारणांमुळे चर्चेत येतो. अनेकदा त्याच्या चर्चेत येण्याचे कारण त्याचे कॉन्सर्ट असतात. अशाच एका कॉन्सर्टची चर्चा होत आहे. हे कॉन्सर्ट सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय ठरलं आहे. (Arijit Singh pune concert costs 16 lakh so much You will be shocked to hear the price of a ticket nz)

 

अरिजित सिंगच्या शोचं तिकिट 16 लाख

अरिजित सिंगच्या लोकप्रियतेचे प्रमाण पाहता, त्याच्या शो आणि संगीत मैफिलीच्या आयोजकांना तिकीट जास्त किमतीत विकणे सोपे आहे. तथापि, त्याच्या आगामी पुणे (Pune) मैफिलीसाठी तिकीटाची किंमत 16 लाखांवर जात आहे, यावर अरिजित सिंगच्या चाहत्यांनाही आश्चर्य व्यक्त केले आहे. 

 

अरिजित सिंग पुढील वर्षी परफॉर्म करणार

अरिजित सिंग पुढील वर्षी जानेवारीत पुण्यातील द मिल्स येथे एका संगीत कार्यक्रमात (Event) परफॉर्म (Perform) करणार आहे. स्टँडिंग एरियाची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते आणि एरिनामधील प्रीमियम लाउंजसाठी 16 लाख रुपयांपर्यंत जाते. ट्विटर वापरकर्त्यानुसार, प्रीमियम लाउंज 1, ज्याची किंमत 16 लाख रुपये आहे. 40 लोक अमर्यादित अन्न (3 व्हेज, 3 नॉन-व्हेज स्टार्टर्स, 2 व्हेज, 2 नॉन-व्हेज मेन कोर्स आणि 1 इंटरनॅशनल डेझर्ट). यासोबत वाईन आणि बिअरही मिळेल.

 

अरिजितला अनेक पुरस्कार मिळाले आहेत

अरिजित हा एक राष्ट्रीय पुरस्कार (National Film Awards) आणि 6 फिल्मफेअर (Filmfare Awards) पुरस्कारांचा विजेता आहे. भारतीय संगीत उद्योगातील सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक म्हणून त्याला ओळखले जाते आणि संपूर्ण दक्षिण आशियामध्ये, विशेषत: भारत (India), पाकिस्तान (Pakistan), बांगलादेश (Bangladesh) आणि नेपाळमध्ये (Nepal) त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याला ‘पार्श्वगायनाचा राजा’ म्हणूनही ओळखले जाते.

अरिजित सिंगचे पदार्पण

त्याने 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या रिअॅलिटी शोमध्ये (Reality Show) भाग घेतल्यानंतर त्याच्या करिअरची सुरुवात केली, परंतु 2013 मध्ये तिच्या 'तुम ही हो' आणि 'चाहूं में या ना' या गाण्यांच्या रिलीजनंतर त्याला जबरदस्त ओळख मिळाली.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x