लग्नानंतर वनिता खरात आणि नवऱ्यामध्ये ओंकार भोजनेनरुन वाद? समोर आलं मोठं कारण

बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिने सृष्टीतही लग्नाचे बार उडत आहेत.नुकतीच मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकली होती. 

Updated: Feb 20, 2023, 09:08 PM IST
लग्नानंतर वनिता खरात आणि नवऱ्यामध्ये ओंकार भोजनेनरुन वाद? समोर आलं मोठं कारण

मुंबई : सध्या सिनेसृष्टीत लग्नसराई सुरुये.  अनेक सेलिब्रिटीज विवाह बंधनात अडकत आहेत. बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिने सृष्टीतही लग्नाचे बार उडत आहेत.  एकीकडे सिनेसृष्टी या कपलच्या  एकत्र येण्याचा आनंद साजरा करत आहे. चाहते या सर्वच नवदांपत्यावर प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अलीकडच्या काळात मराठी कलाकार देखील सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असल्याचं बघितलं जात आहे.

मराठी कलाकारांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. अनेक मराठी सेलिब्रिटीज आपल्या सोशल मीडियावर वेगवेगळे पोस्ट्स शेअर करत असतात. त्यापैकी बरेच सेलेब्रिटी स्वतःकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हटके फोटोज आणि रिल्स शेअर करत असतात. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

विशेष म्हणजे ही पोस्ट देखील वनिता खरातशी निगडित आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'तील अनेक कलाकारांनी देखील तिच्या या ग्रँड विवाह सोहळ्याला हजेरी लावली. केवळ लग्नच नाही तर त्यांनी हळदी आणि संगीत समारंभातदेखील या कलाकारानी सहभाग घेतला होता.

 या लग्न सोहळ्यात ओंकार भोजने दिसला नाही म्हणून उलटसुलट चर्चा सुरु होती. वनिता आणि ओंकारमध्ये काही वाद आहे का अशी शंका चाहत्यांना आली होती. आता मात्र, या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण ओंकार थेट वनिताच्या घरीच जाऊन पोहोचला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे जो तुफान व्हायरल होतोय.

व्हिडियोमध्ये दिसत आहे की, घराची बेल वाजते आणि वनिता दार उघडते. तोच समोर ओंकार उभा असतो. दोघेही एकमेकांना पाहताच घट्ट मिठी मारतात. मात्र अचानक वनिताचा नवरा सुमित लोंढे येतो आणि म्हणतो, 'हे सगळं स्किटमध्ये आता ती माझी बायको आहे.' सध्या हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 अभिनेत्री वनिता खरात आणि (Vanita Kharat) सुमित लोंढे (Sumit Londhe) 5 फ्रेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. वनिताच्या पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी लूक (Vanita Kharat Wedding Look) पाहण्याजोगा होता. तिच्या लग्नाचे फोटो ((Vanita Kharat Wedding photos) तुफान व्हायरल झाले होते