मुंबई : अभिनेत्री अर्चना पूरन सिंगने 'द कपिल शर्मा' शोचे दोन भाग शूट करून झाल्यानंतर शोधून काढता पाय घेतला आहे. क्रिके़टर आणि नेता नवज्योत सिंग सिद्धू काही कामांमध्ये व्यग्र असल्या कारणामुळे ते 'द कपिल शर्मा' शोचे दोन भाग शूट करू शकले नाही. त्यामुळे दोन आठवड्यांसाठी सिद्धूंच्या जगी अर्चना यांची वर्णी लागली होती.
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने रविवारी सोशल मीडियवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये सिद्धूंना शोमधून काढून त्यांच्या जागी अर्चनाचे स्वगत केले. पण सिद्धूंची जागी अर्चना विराजमान होईल का हे आजून स्पष्ट झालेले नाही.
सिद्धूंनी केलेल्या वक्तव्याला देशभरातून विरोध होत आहे. त्यामुळे त्यांना शोमधून काढल्याच्या चर्चांना उधान आले होते. याबाबत आर्चनाने खुलासा करत म्हंटले आहे. 'मी सिद्धूंची जागा घेतलेली नाही. शोमध्ये काम करण्यासाठी 'सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन' कडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.' यावेळी शूटिंग संदर्भात खुलासा देखील अर्चनाने केला. पुलवामा हल्ल्याच्या आधी या दोन भागांचे शूटिंग पूर्ण झाल्योचे अर्चनाने सांगितले.
सिद्धूंनी केलेल्या वक्तव्यामुळे जनसामान्यांमध्ये तिव्र आक्रोश बघायला मिळत आहे. सिद्धूंना बाहेर काढल्यानंतर आता त्यांच्या जागी अर्चनापूरन सिंग यांची वर्णी लागली. नुकताच विनोदवीर कपिल शर्मा चंदीगडमधील आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमात व्यसन मुक्त भारत मोहीमेत सहभागी झाला होता. कार्यक्रमात कपिलला सिद्धूंनी केलेल्या वक्तव्या संबंधित विचारणा करण्यात आली. तेव्हा कपिल सिद्धूंची पाठराखण केली होती.