ही दुसरी पत्नी शुराची मुलगी आहे? अरबाज खानचा 'त्या' मुलीसोबतचा VIDEO मुळे एकच चर्चा

Arbaaz Khan With Second Wife Sshura Khan's Daughter :  अरबाज खान आणि शुरा खानच्या त्या व्हिडीओत दिसणाऱ्या 'या' लहान मुलीनं वेधले सगळ्

दिक्षा पाटील | Updated: Jul 24, 2024, 11:29 AM IST
ही दुसरी पत्नी शुराची मुलगी आहे? अरबाज खानचा 'त्या' मुलीसोबतचा VIDEO मुळे एकच चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Arbaaz Khan With Second Wife Sshura Khan's Daughter : बॉलिवूड अभिनेता अरबाज खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत अरबाज हा एका मुलीसोबत दिसत आहे. चक्क अरबाजनं त्या मुलीचा हात धरून तिला गाडीत बसवलं. त्यामुळे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळे नेटकरी बोलू लागले आहेत की ही मुलगी अरबाजची दुसरी पत्नी शूरा खानची लेक आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अरबाज खान नमस्ते बॉलिवूडडॉटइननं शेअर केला आहे. या व्हिडीओत अरबाज त्या मुलीला गाडीपर्यंत तिचा हात धरून सोडायला जाताना दिसतोय. तर त्यात ती मुलगी देखील एकदा अरबाजकडे पाहते आणि मग गाडिच्या दिशेनं जाते. त्यावेळी गाडी जवळ शूरा देखील दिसते. दरम्यान, गाडीत आधीच एक महिला बसलेली त्या व्हिडीओत दिसतंय तर शुरा त्या मुलीला घेऊन गाडीत बसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

त्यानंतर शूरा पुढे उभी असलेल्या त्याच्या गाडीत जाऊन बसते आणि मग अरबाज देखील त्या गाडीत बसतो. या व्हिडीओला पाहून लोकांना प्रश्न उपस्थित केले आहेत. एका नेटकऱ्यानं विचारलं की ही शूराची मुलगी आहे का? तर दुसरी नेटकरी म्हणाला, जर ही तिची आणि तिच्या पहिल्या पतीची मुलगी असेल तर काय झालं, अरबाज खान कुठे अविवाहीत होता... त्याला पण 22 वर्षांचा मुलगा आहे. 

दरम्यान, शूरासोबत अरबाजनं लग्न केलं ही बातमी पाहिल्यानंतर सगळ्यांना धक्का बसला होता. त्याच्या लग्नाच्या कार्यक्रमात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळची लोकं उपस्थित होती. एका मुलाखतीत अरबाजनं सांगितलं होतं की त्याच्यात आणि शूरामध्ये 25 वर्षांचा फरक आहे. तर दुसरीकडे असं म्हटलं जात होतं की शूराला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून एक मुलगी असून ती 8 वर्षांची आहे.

हेही वाचा : 'बरं झालं करिश्मा कपूरशी लग्न झालं नाही! करीना किमान...' सैफ अली खानचं मोठं विधान

असं म्हटलं जातं की शूराचं पहिलं लग्न हे एका इंटेरियर डिझायनरशी झालं होतं. असं म्हटलं जातं की दोघांमध्ये कम्पॅटिबल इशूज वाढू लागले होते आणि रोज त्यांच्यात भांडण व्हायची. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर असं देखील म्हटलं जातं की शूराचं हे सत्य आधी खान कुटुंबाला माहित झालं आणि त्यामुळे त्याच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. मात्र, या सगळ्या अफवा असल्याचं अरबाजनं सांगितलं होतं.