अरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान

Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: अरबाज खाननं शुराच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करताच मुलगा अरहाननं लावली हजेरी, व्हिडीओ होतोय व्हायरल

दिक्षा पाटील | Updated: Jan 19, 2024, 12:01 PM IST
अरबाज खाननं दुसऱ्या पत्नीसाठी प्लॅन केली बर्थडे पार्टी; सावत्र आईला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला अरहान title=
(Photo Credit : Social Media)

Arbaaz Khan Wife Sshura Khan Birthday: बॉलिवूड अभिनेता अरबाज खाननं 2023 मध्ये गर्लफ्रेंड शुरा खानसोबत विवाह केला. त्यांच्या विवाहात काही जवळच्या लोकांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांच्या विवाहातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर अरबाज लगेच त्याची पत्नी शुरासोबत हनीमुनला गेला होता. आता काल 18 जानेवारी रोजी शुराचा वाढदिवस होता. त्या निमित्तानं खास सेलिब्रेशन करण्यात आलं होत. तर कपलनं घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. ज्यात संपूर्ण खान कुटुंब पाहायला मिळालं. शुराच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यात खान कुटुंब देखील दिसत आहे. 

अरबाजनं शुराच्या वाढदिवसासाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. त्याआधी या जोडप्यानं पापाराझींना फोटो काढण्यासाठी पोज दिल्या. त्यावेळी अरबाजनं स्मार्ट कॅज्युअल परिधान केले होते. तर शुरानं लाल रंगाचं पॅन्ट-सूट परिधान केला आहे. त्याशिवाय शुरा यावेळी पापाराझींसोबत वाढदिवसाचा केक कट करताना दिसली. या पार्टीत सलमान खानची सगळ्यात शेवटची एन्ट्री होती. त्यानं ऑल ब्लॅक लूक कॅरी केला होता. तर यावेळी सगळ्यांचं लक्ष कोणी वेधलं असेल तर तो अरबाज आणि मलायकाचा 21 वर्षांचा मुलगा अरहाननं देखील या पार्टीत हजेरी लावली आहे. अरहाननं त्याच्या दुसऱ्या किंवा सावत्र आईच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानची आई सलमा यांनी देखील त्यांच्या नवीन सुनेच्या वाढदिवसाच्या पार्टीत हजेरी लावली होती. सलमा खान यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी सोहेल खानचा मुलगा निर्वान बाहेर आल्याचे पाहायला मिळाले. तर सलीम खान यांनी मात्र हजेरी लावली नव्हती. हेलन या देखील यावेळी दिसल्या त्यांनी अरबाजच्या घराच्या बाहेर असलेल्या पापाराझींनी पोज दिल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : 'जय श्री राम' म्हणत नयनतारानं मागितली माफी, 'अन्नपूर्णी' चित्रपटातील रामाच्या आक्षेपार्ह संदर्भाबाबत अभिनेत्रीची पोस्ट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाज आणि शुराच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर 24 डिसेंबर 2023 रोजी ते लग्न बंधनात अडकले. त्याआधी मलायका अरोराशी त्याचं लग्न झालं होतं. 19 वर्ष सुखी संसार केल्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर मे 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. ते दोघं ही आता एकत्र मिळून अरहानचा सांभाळ करत आहेत.