जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा म्हणाला ती माझी...

मलायका अरोरापासून घेतलेल्या घटस्फोटानंतर अरबाज बर्‍याच दिवसांपासून जॉर्जियाला डेट करत आहे.

Updated: Jul 22, 2021, 11:04 PM IST
जॉर्जिया एंड्रियानीसोबतच्या नात्यावर अरबाजचा खुलासा म्हणाला ती माझी... title=

मुंबई : अभिनेता अरबाज खानचं म्हणणं आहे की, जॉर्जिया एंड्रियानीला त्याची 'गर्लफ्रेंड' बंद केलं पाहिजे. मलायका अरोरापासून घेतलेल्या घटस्फोटानंतर अरबाज बर्‍याच दिवसांपासून जॉर्जियाला डेट करत आहे. हे दोघंही बर्‍याचदा एकमेकांसोबत स्पॉट होत असतात, एवढंच नव्हे तर त्यांच्या लग्नाबद्दलही रोज नव-नवीन बातम्या समोर येत असतात. एका मुलाखती दरम्यान अरबाज खान म्हणाला की, आता संपूर्ण जग जॉर्जियाला ओळखतं आणि म्हणूनच नेहमीच तिला माझी गर्लफ्रेंन्ड म्हणणं योग्य नाही.

'गर्लफ्रेंड' म्हणणं चुकीचं आहे
एका मुलाखतीमध्ये बोलताना अरबाज खान म्हणाला की, "सर्वात पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं तिला एक व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 'आणि मी त्या सगळ्यांची नावं घेईन जे सतत येवून जॉर्जियाला अरबाजची गर्लफ्रेंन्ड आणि 'बे' म्हणतात'. तिची एक ओळख आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही. आणि असं करुही नये. ती माझ्या आयुष्यात खूप महत्वाची आहे, मात्र ती तिची ओळख नाही. जेव्हा आपण माझ्याबद्दल लिहिता आणि मला 'सलीम खानचा मुलगा' किंवा 'सलमान खानचा भाऊ' असं म्हणता. का? आपण असं का करता? प्रत्येकाला त्याची स्पेस आणि ओळख द्यायला हवी. आणि तिलापण हेच हवं असेल."

जॉर्जियाला जाणून घ्यायचं आहे ती कोण आहे?
अरबाज पुढे म्हणाला की, आता संपूर्ण जगाला माहित आहे की ती कोण आहे? म्हणूनच तिचं नाव माझ्याशी जोडणं चुकीचं आहे आणि असं करणारे लोक जर असा विचार करत असतील ती फारशी लोकप्रिय नाही तर त्यांनी तिचे फोटो काढणं बंद केलं पाहिजे. तिला हे सगळं वाईट नाही वाटत कारण, ती माझी गर्लफ्रेंन्ड होण्याकरिता लाजिरवाणी आहे, यासाठीच ती जाणून घेवू ईच्छिते की, ती कोण आहे.

अरबाज खान 'पिंच 2'मुळे चर्चेत
अरबाज खान आजकाल आपल्या टॉक शो पिंच -2मुळे चर्चेत आहे. सलमान खान या सिझनमधील पहिला पाहुणा कलाकार आहे. आता आगामी भागांमध्ये अनन्या पांडे, फराह खान, टायगर श्रॉफ आणि इतर पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत.