'त्यावेळी ते गरजेचं होतं' मलायकासोबतचं १९ वर्षांचं नातं तोडल्यानंतर बोलला Arbaaz Khan

आजही तो दिवस आठवताना अरबाज स्तब्ध 

Updated: Jan 18, 2022, 03:51 PM IST
'त्यावेळी ते गरजेचं होतं' मलायकासोबतचं १९ वर्षांचं नातं तोडल्यानंतर बोलला Arbaaz Khan  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अरबाज खान ही जोडी एकेकाळी इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक होती. अरबाज आणि मलायका यांच्या लग्नासोबतच त्यांच्या घटस्फोटाकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. मलायका आणि अरबाजची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. हे दोघं पाहताच क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडले. बराच काळ डेट केल्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केले.

लग्नानंतर या दोघांच्या घरी आनंदाचा क्षण म्हणजे मुलगा अरहान खानचा जन्म झाला. बरेच दिवस सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर मलायका आणि अरबाज यांच्यात वाद सुरू झाला. लग्नाच्या 19 वर्षानंतर, 2017 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर हे जोडपे एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. मलायकापासून घटस्फोट घेतल्यानंतर अरबाजने एका मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर बोलताना सांगितले की, 'त्यावेळी गोष्टी चांगल्या करणे आवश्यक होते आणि ते थांबवता येणार नव्हतं'.

या मुलाखतीत अरबाजला असेही विचारण्यात आले होते की, या घटस्फोटावर त्याचा मुलगा अरहानची प्रतिक्रिया कशी होती? या प्रश्नाच्या उत्तरात अरबाजने सांगितले की, अरहान तेव्हा १२ वर्षांचा होता आणि घरात काय चालले आहे ते त्याला चांगले समजत होते.

मात्र, घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असताना, अरबाज खान देखील इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत नात्यात आहे. घटस्फोटानंतर या दोघांनी डेट करत असलेल्या व्यक्तीसोबत अद्याप लग्न केलेलं नाही.