नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यावर असं गाणं अजून कुणी बनवलं नसेल...

नोटबंदी, जीएसटी आणि रेरा यावर असं गाणं अजून कुणी बनवलं नसेल...

Updated: Sep 20, 2018, 08:15 PM IST

मुंबई : नोटाबंदी, जीएसटी, रेरावर असं गाणं अजून कुणी बनवून नसेल असंच तुम्हाला हे गाणं ऐकल्यानंतर वाटेल. मुळशी पॅटर्न या सिनेमातील हे गाणं आहे. आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. गाण्याला संगीत दिलं आहे, नरेंद्र भिडे यांनी, तर गाणं लिहिलंय, प्रणित कुलकर्णी यांनी. अरारारारा खतरनाक असं गाण्याचे बोल आहेत. प्रवीण तर्डे यांच्या अभिनयाने या गाण्यात रंग भरले आहेत. अभिजित भोसले आणि पुनीत बालन यांचा देखील या गाण्यात अभिनय आहे. या सर्वांच्या अभिनयाचं आणि गाण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.