आराध्याने पेंटिगच्या माध्यमातून मानले कोरोना वीरांचे आभार

एक सुंदर आणि अत्यंत बोलकं चित्र   

Updated: May 4, 2020, 06:39 PM IST
आराध्याने पेंटिगच्या माध्यमातून मानले कोरोना वीरांचे आभार  title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिने एक सुंदर आणि अत्यंत बोलकं चित्र रेखाटून कोरोना वीरांचे आभार मानले आहेत. आराध्या आठ वर्षांची आहे. ऐश्वर्याने लेकीनं रेखाटलेलं चित्र सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे. तिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'माझी मुलगी आराध्याकडून कोरोना वीरांना सन्मान आणि आभार..' असं लिहिलं आहे. आराध्याने रेखाटलेलं हे चित्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

my darling Aaradhya’s Gratitude and Love 

A post shared bshwaryaraibachchan_arb) on

आराध्याने साकारलेलं हे चित्र फक्त ऐश्वर्याने नाही तर आजोबा अमिताभ बच्चन यांनी देखील शेअर केलं आहे. 'वयाच्या आठव्या वर्षी तुम्ही हे अनभवू शकता, समजू शकता आणि दाखवू देखील शकता...' असं कॅप्शन बिग बींनी आराध्याच्या विचार आणि कल्पना शक्तीला दिलं आहे.

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता फैलाव थांबवण्यासाठी डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने या संकटाचा सामना करत आहेत. स्वतःच्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता ते या भयानक संकटाचा सामना करत आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी कोरोनावीर दिवस रात्र एक करत आहे.