गौरी लंकेश हत्या : AR रेहमान म्हटला हा माझा भारत नाही...

 देश प्रेमाने ओतप्रोत असलेल्या ' माँ तुझे सलाम' आणि 'वन्दे मातरम' सारख्या संगीत रचना करणारे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येसारख्या घटना होत असतील तर हा माझा भारत नाही. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Sep 8, 2017, 04:45 PM IST
 गौरी लंकेश हत्या : AR रेहमान म्हटला हा माझा भारत नाही...  title=

मुंबई :  देश प्रेमाने ओतप्रोत असलेल्या ' माँ तुझे सलाम' आणि 'वन्दे मातरम' सारख्या संगीत रचना करणारे संगीतकार ए. आर. रेहमान यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येसारख्या घटना होत असतील तर हा माझा भारत नाही. 

रेहमान गुरूवारी मुंबईमध्ये आपली आगामी फिल्म 'वन हार्ट : द एआर रेहमान कन्सर्ट फिल्म' च्या प्रीमिअरवेळी बोलत होते. 

बंगळुरूमध्ये गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेहमान म्हणाले, मी हे ऐकून खूप दुखी झालो, मी आशा करतो की भारतात अशा गोष्टी होणार नाही. जर भारतात अशा गोष्टी होती तर तो माझा भारत नाही. मला वाटते की माझा भारत प्रगतीशील आणि विनम्र असायला हवा. 

 'वन हार्ट : द एआर रेहमान कन्सर्ट फिल्म'  हा चित्रपट उत्तर अमेरिकेतील १४ शहरांमध्ये होणाऱ्या कन्सर्टवर आधारीत आहे. यात रेहमान आणि त्यांच्या बँडच्या कलाकारांच्या मुलाखती आहे. तसेच त्यांचा सरावांचा समावेश आहे. तसेच यात रेहमान यांची खासगी माहिती मिळणार आहे.