इंडस्ट्रीमधील विरोधी गटांमुळे मला काम मिळत नाही - ए. आर. रेहमान

अभिनेत्री कंगना रानौतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.  

Updated: Jul 26, 2020, 03:10 PM IST
इंडस्ट्रीमधील विरोधी गटांमुळे मला काम मिळत नाही - ए. आर. रेहमान title=

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही आणि मक्तेदारीच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद पेटला आहे. या पेटत्या वादाला अभिनेत्री कंगना रानौत चांगलाचं दुजोरा देताना दिसत आहे. तिच्या पाठोपाठ कित्येक कलाकारांनी आपल्या प्रवासातील अडचणींचा खुलासा केला. बॉलिवूडमध्ये गटबाजीला कंटाळून अनेक कलाकारांनी कलाविश्वाला रामराम ठोकला, तर काहींनी आपला जीवन प्रवासचं संपवला. 

अशात ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान यांनी धक्कादायक खुलासा केला. इंडस्ट्रीमध्ये विरोधी गटाचा अननुभव  प्रत्येकाला येतो असं म्हणतं त्यांनी एक विरोधी गट माझ्याविरोधात अफवा पसरवत असल्याचे  रेहमान म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर कंगनाने देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली, 'इंडस्ट्रीमध्ये विरोधी गटाचा अननुभव  प्रत्येकाला येतो. खासकरून तुम्ही जेव्हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून प्रवास करता.' तिच्या या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगलाच पाठिंबा दिला आहे. 

सांगायचं झालं तर, एका मुलाखती दरम्यान 'तुम्ही चित्रपटांमध्ये संगीत दिग्दर्शन फार कमी करता..' असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाचा उत्तर देताना त्यांनी खळबळजनक खुलासा केला. 'मी चांगले चित्रपट कधीच नाकारत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये एक गट आहे. जो माझ्या विरोधात अफवा पसरवतो.' असं ते म्हणाले. 

शिवाय 'दिल बेचारा' चित्रपटात त्यांच्या विरोधात घडलेली एक घटना देखील त्यांनी यावेळी सांगितली. 'छाब्रा यांनी मला सांगितले की अनेकांनी त्यांना माझ्याकडे जाऊ नका असे म्हटले. विरोधी गटांनी छाब्रा यांना देखील माझ्या विरोधात अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामुळे आता मला कळालं की मला सध्या काम का मिळत नाही.' असं स्पष्टीकरण प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांनी केलं.