Khuda Hafiz trailer: हरवलेल्या प्रेमाच्या शोधात विद्युत जामवाल

१४ ऑगस्ट २०२० रोजी 'खुदा हाफिस' चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे.     

Updated: Jul 25, 2020, 07:43 PM IST
Khuda Hafiz trailer: हरवलेल्या प्रेमाच्या शोधात विद्युत जामवाल  title=

मुंबई : 'मुझे मेरी नर्गिस चाहीऐ...' खऱ्या प्रेमात किती ताकद असते हे अधोरेखीत करणारा 'खुदा हाफिस' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'खुदा हाफिस' चित्रपटाची कथा नवीन जोडप्याच्या जीवनाभोवती फिरताना दिसत आहे. नुकताच भारतात विवाहबंधनात अडकलेलं हे जोडपं करियरच्या चांगल्या शोधण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या या प्रवासात नर्सिग परदेशात बेपत्ता होते आणि समीरचा तिला शोधण्याचा प्रवास सुरू होतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#KhudaHaafizTrailer out now- (Link in Bio) @shivaleekaoberoi @annukapoor @nawwabshah @aahanakumra @shivpanditt @kumarmangatpathak @abhishekpathakk @farukkabir9 @mithoon11 @panorama_studios @disneyplushotstarvip @zeemusiccompany

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal) on

'खुदा हाफिस' चित्रपटात अभिनेता विद्युत जामवाल (समीर) आणि अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अशी रंजक कथा असणारा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १४ ऑगस्ट २०२० रोजी  प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि लेखणाची जबाबदारी फारूक कबीर यांच्या खांद्यावर आहे. तर चित्रपटाची निर्मिती निर्माता अभिषेक पाठक करणार आहेत. डिस्ने हॉटस्टारवर मल्टिफ्लेक्स अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी 'खुदा हाफिज' तिसरा चित्रपट आहे.