श्रीदेवी यांच्यासोबत 'या' फोटोत दिसणारी दोन मुलं आहेत बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध कलाकार

श्रीदेवी आज या जगात नाहित, पण त्यांच्या चित्रपट, अभिनय आणि कामाच्या माध्यमातून त्या सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहतील.

Updated: Aug 24, 2022, 12:06 AM IST
श्रीदेवी यांच्यासोबत 'या' फोटोत दिसणारी दोन मुलं आहेत बॉलिवूडचे दोन प्रसिद्ध कलाकार title=

मुंबई : श्रीदेवी आज या जगात नाहित, पण त्यांच्या चित्रपट, अभिनय आणि कामाच्या माध्यमातून त्या सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहतील. अनेकदा दिवंगत अभिनेत्रीचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. जे तिचे चाहते मोठ्या प्रेमाने आणि उत्साहाने पाहतात. असाच एक फोटो आजकाल व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये श्रीदेवी दिसत आहेत. पण त्यांच्यासोबत या फोटोमध्ये इंडस्ट्रीतील आणखी दोन कलाकार आहेत. ज्यांना ओळखण्यासाठी आम्ही तुम्हाला टास्क देत आहोत.

तुम्ही या दोन स्टार्संना ओळखू शकता का?
श्रीदेवी यांच्याशिवाय या फोटोतील आणखी दोन स्टार्सला तुम्ही ओळखू शकाल का? फक्त फोटो नीट बघा, कदाचित तरीही तुम्ही त्या कलाकारांना ओळखू शकत नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो. या फोटोत एका अभिनेत्याला मिलेनियम स्टारचा दर्जा मिळाला आहे. तर दुसरी अभिनेत्री आजही  स्टाईलमुळे चर्चेत आहे आणि नुकतीच ती आई झाली आहे. साहजिकच आता तुम्हाला समजलंच असेल की, आता आम्ही कशाबद्दल बोलत आहोत.

खरंतर, या फोटोत केक खाणारी मुलगी दुसरी कोणी नसून सोनम कपूर आहे. जी लहानपणापासूनच कपूर कुटुंबाची लाडकी आहे. त्याचबरोबर, गुबगुबीत डोळ्यांनी मजेदार पोझ देणारा मूलगा म्हणजे या शतकातील स्टार हृतिक रोशन आहे. जो आजही दोन दशके इंडस्ट्रीवर राज्य करत आहेत.