लग्नानंतर अनुष्का शर्मा करतेय हे काम....

विरूष्काचं लग्न हे सर्वात चर्चेतली बाब.... 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 29, 2018, 08:22 PM IST
लग्नानंतर अनुष्का शर्मा करतेय हे काम.... title=

मुंबई : विरूष्काचं लग्न हे सर्वात चर्चेतली बाब.... 

बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सर्वात हॅपनिंग जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. हल्ली हे दोघं काय करतात याकडे साऱ्यांचच लक्ष आहे. विराट तर सध्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात बिझी आहे. मात्र अनुष्का काही तरी हटके करत आहे.  आणि तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या गैरहजेरीत अनुष्का बऱ्याच गोष्टी करायला शिकली आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. 

या फोटोत अनुष्का सुई धाग्याने विणकाम करताना दिसत आहे. आणि तिने कॅप्शन असं टाकलं आहे, कतरन से बुनी कहानी पैबंद लगा के है सुनानी - सुई धागा. यावरून आपल्याला अंदाज आला असेल की हे अनुष्काच्या नव्या सिनेमाशी संबंधित आहे.  पहिल्यांदाच अनुष्का आणि वरुण एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात वरुण टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे.

यात अनुष्का कोणती भूमिका साकारणार हे अद्याप कळू शकलेले नाही.  या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व शरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते. यश राज बॅनरखाली तयार होणार हा चित्रपट गांधी जयंतीच्या आधी चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे म्हणजेच 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटासह अनुष्काच्या खात्यात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या परी चित्रपटात ती दिसणार आहे. हा एक सुपरनॅचुरल थ्रिलर असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय  आनंद एल रॉय यांच्या आगामी चित्रपट हिरोमध्ये ही ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला अनुष्काने आधीच सुरुवात केली आहे.