कंपन्यांच्या CEO पेक्षा अधिक आहे विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी, कोण आहे प्रकाश सिंह?

विरुष्का कायमच त्यांच्या खासगी गोष्टीमुळे चर्चेत राहतात. वामिका आणि अकायचा जन्म असो किंवा त्यांचा खास बॉडीगार्ड असो. प्रकाश सिंहला त्याच्या या सेवेसाठी कि=

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 17, 2024, 01:15 PM IST
कंपन्यांच्या CEO पेक्षा अधिक आहे विराट-अनुष्काच्या बॉडीगार्डची सॅलरी, कोण आहे प्रकाश सिंह?  title=

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि IPL 2024 च्या RCB चा ओपनर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं अतिशय लोकप्रिय आणि प्रभावशाली असं जोडपं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोघांचा मोठा चाहता वर्ग आहे ज्यांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास अधिक इंटरेस्ट आहे. एवढंच नव्हे तर या दोघांसोबत फोटो काढण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात. 

विराट अनुष्काने आपल्या दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत. एवढंच नव्हे तर अनुष्का आता अकायला घेऊन भारतात परतली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलही चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळते. असं असता या दोघांना अतिशय टाईट आणि विश्वासू सिक्युरिटीची नितांत गरज आहे. विराट आणि अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डचं नाव सोनू असं आहे. सोनू अनुष्का शर्मापासून गेल्या अनेक वर्षांपासून आहे. आता तो माजी कर्णधाराचा अंगरक्षक म्हणूनही काम करतो. सोनू याचं खरं नाव प्रकाश सिंह असं आहे. प्रकाश देत असलेल्या सेवेबाबत त्याला भरघोस पगार घेतो. 

अनुष्का विराट कोहलीसोबत 2017 मध्ये लग्न करण्या अगोदर सोनू म्हणजे प्रकाश सिंह अंगरक्षकाचं काम करत होता. प्रकाश सिंह याचा वार्षिक पगार हा 1.2 कोटी रुपये इतके आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कंपनीच्या CEO पेक्षा हा पगार नक्कीच जास्त आहे. 

महत्त्वाचं म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे प्रकाश सिंह म्हणजे सोनू याच्याशी अगदी छान जोडले गेले आहेत. त्यांच्यासाठी तो अगदी कुटुंबातील एक भाग आहे. हे दोघं सोनूचा वाढदिवसही अतिशय मनापासून साजरा करतात. 2018 मध्ये अनुष्का शर्मा Zero सिनेमाचं शुटिंग करत होती त्यावेळी सोनूच्या वाढदिवसाचा फोटो शेअर केला होता. 

अनुष्का शर्मा व्यतिरिक्त सोनू सार्वजनिक ठिकाणी विराट कोहलीच्या सुरक्षेचीही काळजी घेतो. जेव्हा अनुष्का शर्मा वामिकाच्यावेळी गरोदर होती, तेव्हा तिला अनेकदा अभिनेत्रीसोबत पाहिले जात असे, जेव्हा ती बाहेर पडते तेव्हा तिच्यासोबत जात असे. नुकतेच, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनेही अलीकडेच त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी त्याचे नाव अकाय कोहली ठेवले.