VIDEO : अनुष्काच्या 'परी'चा आणखी एक स्क्रिमर प्रदर्शित

निर्माती-अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा 'परी - नॉट अ फेअरीटेल' हा सिनेमा शुक्रवारी २ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. आज या चित्रपटाचा आणखीन एक टिझर - स्क्रिमर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Mar 1, 2018, 08:16 PM IST
VIDEO : अनुष्काच्या 'परी'चा आणखी एक स्क्रिमर प्रदर्शित title=

मुंबई : निर्माती-अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा 'परी - नॉट अ फेअरीटेल' हा सिनेमा शुक्रवारी २ मार्च रोजी प्रदर्शित होतोय. आज या चित्रपटाचा आणखीन एक टिझर - स्क्रिमर प्रदर्शित करण्यात आलाय. 

या स्क्रिमरमध्ये एक गर्भवती स्त्री बाथटबमध्ये आपल्या बाळाच्या आगमनाची प्रतिक्षा करताना दिसतेय. परंतु, तिला होणाऱ्या वेदना पाहून या सिनेमात किती ड्रामा आहे, याचा अंदाजा प्रेक्षकांना येऊ शकतो.

बॉलिवू़डची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली देत 'परी' या सिनेमाचं स्पेशल स्क्रिनिंग रद्द करण्यात आलं होतं. २८ फ्रेबुवारी रोजी या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.

'नॉट अ फेयरीटेल' अशी टॅगलाईन असलेला 'परी' हा एक सुपरनॅच्युरल थ्रिलर सिनेमा आहे. 'परी'... यात परी म्हणजे सुंदर, देखणी अशी प्रतिमा तुमच्या डोळ्यांसमोर येत असेल तर या सिनेमाचे आत्तापर्यंत प्रदर्शित झालेले टीझर ही प्रतिमा पार पुसून टाकण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळेच नेमकं या सिनेमात काय आहे? याची प्रेक्षकांची उत्सुकता लागून राहिलीय. 

या सिनेमाची निर्मिती अनुष्काच्या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत झाली असून याआधी तिने 'एन. एच. १०' आणि 'फिल्लोरी' या सिनेमांची निर्मिती केली होती. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रासित रॉय यांनी केलंय. आता या सिनेमाचा थरार अनुभवण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.