अनुष्का शर्माचा प्रियांका चोप्राला लाखमोलाचा सल्ला, म्हणाली...

अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे

Updated: Jan 26, 2022, 10:37 PM IST
अनुष्का शर्माचा प्रियांका चोप्राला लाखमोलाचा सल्ला, म्हणाली... title=

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी 21 जानेवारीच्या रात्री उशिरा सोशल मीडियावर पालक बनल्याची माहिती दिली. बातम्यांनुसार, हे दोन्ही स्टार्स एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेलं नाही. दरम्यान, प्रियंकासोबत काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने प्रियांकाला आई झाल्यावर  पहिलाच असा सल्ला दिला की, ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली.

इंस्टा स्टोरीवर सांगितली ही गोष्ट
अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये अनुष्का शर्माने प्रियंका आणि निक यांना पालक बनल्याबद्दल अभिनंदन केलं आणि अशी गोष्ट सांगितली जी, लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

दिला सल्ला
पोस्ट शेअर करत अनुष्का शर्माने कॅप्शनमध्ये लिहिलं, 'प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं खूप खूप अभिनंदन. स्लीपलेस रात्रीसाठी आणि प्रेमाने भरलेल्या नवीन राईडसाठी सज्ज व्हा.'

अशी दिली प्रियांकाने आई बनल्याची बातमी
प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिने लिहिलं आहे की, ''हे सांगताना मला खूप आनंद होत आहे की, आम्ही सरोगसीद्वारे एका मुलीचे पालक झालो आहेत. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही तुम्हाला या विशेष काळात गोपनीयतेसाठी आदरपूर्वक आवाहन करतो. खूप खूप धन्यवाद. ही पोस्ट निक जोनासनेही इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.