रतन टाटांसाठी अनुष्का शर्माची क्रिप्टिक पोस्ट? लोक म्हणाले...

Anushka Shrama Post : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. सर्वजण त्यांना आदरांजली वाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले. अशातच अनुष्का शर्मानेही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने रतन टाटा आणि शंतनु नायडू दाखवल्याचे मानले जात आहे. कोणती आहे ती पोस्ट? नक्की काय आहे त्या पोस्टमध्ये जाणून घेऊया.

Updated: Oct 12, 2024, 01:15 PM IST
रतन टाटांसाठी अनुष्का शर्माची क्रिप्टिक पोस्ट? लोक म्हणाले... title=

Anushka Shrama Post on Ratan Tata Death: भारताचे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे यशस्वी उद्योगपती तर होतेच पण महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता सामान्यांसाठी काम केले. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर करोडो लोकांनी टाटांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्टचा केल्या आहेत. यात अभिनेत्री अनुष्का शर्मानेही एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्का शर्माची ही पोस्ट जरा वेगळीच आहे. तिने त्या पोस्टद्वारे एक स्केच शेअर केले आहे. ज्यात एक तरुण मुलगा भर पावसात एका वृद्ध माणसाला पावसापासून वाचवण्यासाठी छत्री घेऊन उभा आहे. या स्केचसोबतच अनुष्काने कॅप्शनमध्ये हार्ट इमोटिकॉन पोस्ट केला आहे. अनुष्काने शेअर केलेलं हे स्केच रतन टाटांशी संबंधीत असल्याचे सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट

अनुष्का शर्माने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. त्यात तिने एक मुलगा आणि एक वृद्ध व्यक्तीचे स्केच शेअर केले आहे. त्यावर यूजर्सचे म्हणणे आहे की, 'छत्री पकडलेला तो माणूस शंतनु नायडू आहे आणि त्यातील वृद्ध व्यक्ती रतन टाटा आहेत.'

 

 

 

सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे योग्य आहे का?

अनुष्कच्या या पोस्टवरती तिच्या चाहत्यांनी आणि अनेक टाटा प्रेमींनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. शंतनु नायडू हा रतन टाटांच्या खूप जवळचा व्यक्ती आणि खास मित्र होता. शंतनु नायडू रतन टाटा यांना आपले लाईटहाऊस म्हणायचा. पण अनुष्कच्या या पोस्टवर यूजर्सने जरी वेगवेळ्या कमेंट करून हे चित्र कोणाचे आहे हा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, अनुष्काने हे चित्र कोणाचे आहे हे स्पष्ट केलेले नाही. 

कमेंटमध्ये एक यूजर असेही लिहितो की, 'ज्यांना हे चित्र समजले नाही त्यांच्यासाठी - हे चित्र दयाळूपणा, सहानुभूती आणि निःस्वार्थतेचे प्रतीक आहे. या चित्रात दाखवले आहे की, कोणीतरी भर पावसात दुसऱ्या व्यक्तीसाठी छत्री धरून स्वतः मात्र भिजत उभा आहे. ही कृती इतरांची काळजी दर्शवते, त्यासाठी वैयक्तिक त्याग करण्याची गरज भासते. यातून हे सूचित होते की खरा आशीर्वाद इतरांना मदत केल्याने आणि तुमच्या स्वतःच्या परिस्थितीची पर्वा न करता दुसऱ्यासाठी त्याग केल्याने मिळतो.'

अनुष्का शर्मानची रतन टाटांना श्रद्धांजली 

गुरुवारी अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केला आणि लिहिले की, 'श्री रतन टाटा यांच्या निधनाच्या बातमीने खूप दुःख झाले. त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतून त्यांनी अखंडता, कृपा आणि सन्मानाची मूल्ये जपली. ते खरोखरच भारताचे रत्न होते. आरआयपी सर, तुम्ही अनेकांच्या आयुष्याची प्रेरणा आहात.'