वरूण-अनुष्काने गांधीजींना वाहिली 'अशी' श्रद्धांजली

आज गांधी जयंतीच्या निमित्ताने वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी महात्मा गांधींजींना श्रद्धांजली देत 'सुई धागा' या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीजरही रिलीज केला आहे. 

Updated: Oct 2, 2017, 02:29 PM IST
वरूण-अनुष्काने गांधीजींना वाहिली 'अशी' श्रद्धांजली  title=

मुंबई : आज गांधी जयंतीच्या निमित्ताने वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी महात्मा गांधींजींना श्रद्धांजली देत 'सुई धागा' या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टीजरही रिलीज केला आहे. 

'मेक इन इंडिया'चे खरे निर्माते गांधीजी आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करत अनुष्का आणि वरूणने 'सुई धाग्या'ची झलक  दाखवली आहे. 

 

यश राज बॅनर्सचा आगामी चित्रपट 'सुई धागा' पुढल्या वर्षी २ ऑक्टोबर रोजी रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे शुटींग जानेवारी २०१८ मध्ये सुरू होईल. या चित्रपटात वरूण आणि अनुष्का ही जोडी पहिल्यांदा झळकणार आहे. शरत कटियार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाची कथा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या मेक इन इंडियाच्या कॅम्पेनवर आधारित आहे.