...या आलिया आणि अनुष्का नाहीत

आलिया आणि अनुष्काच्या हुबेहुब पाहिल्यात का?

Updated: Feb 6, 2019, 10:46 AM IST
...या आलिया आणि अनुष्का नाहीत title=

मुंबई : बॉलिवूडमधील अनेक कलाकारांचे त्यांच्यासारखेच दिसणारे लोक पाहण्यात आले आहेत. आता या लिस्टमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचंही नाव सामिल झालं आहे. विराट आणि अनुष्का कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. पण यावेळी मात्र या दोघांच्या चर्चेत येण्याचं वेगळंच कारण आहे. अनुष्का शर्मासारखी दिसणारी व्यक्ती एक सिंगर असून तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनुष्कासारखी दिसणारी ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून अमेरिकन सिंगर जूलिया मायकल्स आहे. अनुष्का आणि जूलिया या दोघींनाही या सेम टू सेमला मजेशीररित्या उत्तर दिलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनुष्का शर्माच्या कार्बन कॉपीने सोशल मीडियावर तुफान केलं आहे. सोशल मीडियावर जूलिया आणि अनुष्काचा फोटो व्हायरल होत आहे. २५ वर्षीय अमेरिकन गायक जूलिया मायकल्सला इतके वेळा सर्च आणि टॅग केलं जात आहे की ती भारतात ट्विटरवर ट्रेंड होतेय. जूलिया गाणं गाण्यासह स्वत: गाणीदेखील लिहिते. २०१७ मध्ये जूलियाने संगीत जगतात डेब्यू केला होता. तिचा पहिला सोलो सिंगल इशूज २०१७ साली प्रदर्शित झाला होता. 

अनुष्का तिच्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीमुळे चर्चेत असताना आता आलिया भट्टही तिच्या कार्बन कॉपीमुळे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलियाची ही कार्बन कॉपी सेम टू सेम तिच्या आगामी 'गली बॉय'मधील पात्रासारखी दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by sanayaashu (@ashu0876962) on