मुंबई : बुधवारी सकाळी दिग्दर्शक अनुराग कश्यप(Anurag Kashyap) , विकास बहल (Vikas Bahal) आणि अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu) यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत या तिघांच्या घरी आयकर विभागाचे अधिकारी चौकशी करत होते. एवढंच नव्हे या तिघांच्या मालमत्तेवर मुंबई, पुण्यात 30 ठिकाणी रात्री उशिरापर्यंत छापे मारले आहेत. तसेच काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत.
Maharashtra: Income Tax officials leave the residence of film director Anurag Kashyap in Mumbai after conducting a raid. https://t.co/CamM3qOVbr pic.twitter.com/Shl4oMXH9Q
— ANI (@ANI) March 3, 2021
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांची पुण्यात चौकशी करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांची झालेली ही चौकशी पुण्यातील हॉटेलमध्ये झाली. या दरम्यान आयकर चोरी प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजे गुरूवारी देखील ही चौकशी होणार आहे. (बॉलिवूडचे सुपरस्टार आयकर अधिकाऱ्यांच्या जाळ्यात)
Maharashtra: Income Tax raids underway at the properties of film director Anurag Kashyap and actor Taapsee Pannu in Mumbai. Visuals from the residence of Anurag Kashyap. pic.twitter.com/YiS71AyeRO
— ANI (@ANI) March 3, 2021
आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू, दिग्दर्शक अनुराग कश्यपची कंपनी 'फँटम' सिनेमा आणि कलाकारांचा शोध घेणार कंपनी आहे. या कंपनीसह अन्य परिसरात बुधवारी छापे टाकण्यात आलं. कश्यप 'फँटम' फिल्म्सचे को-प्रमोटर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे येथे 30 ठिकाणी छापे मारले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तापसी पन्नूशी संबंधित व्यवसायाचे परिसर आणि विकास बहलसह फँटम फिल्म्सशी जोडलेल्या परिसरात देखील छापे मारले. या कलाकारांच्या मुंबई आणि त्या बाहेरील परिसरात छापे मारले.