पद्मावतीच्या 'घुमर' गाण्यात दिसलेली ती मुलगी कोण, जाणून घ्या...

नुकतंच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमातलं 'घुमर' हे गाणं प्रदर्शित झालंय... या एकाच गाण्यातून अभिनेत्री दीपिका पादूकोणनं प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडलंय... पण, या गाण्यात दिसणारा आणखीन एक चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय.

Updated: Oct 28, 2017, 07:43 PM IST
पद्मावतीच्या 'घुमर' गाण्यात दिसलेली ती मुलगी कोण, जाणून घ्या...  title=

मुंबई : नुकतंच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती सिनेमातलं 'घुमर' हे गाणं प्रदर्शित झालंय... या एकाच गाण्यातून अभिनेत्री दीपिका पादूकोणनं प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पडायला भाग पाडलंय... पण, या गाण्यात दिसणारा आणखीन एक चेहरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय.

पद्मावतीचं पहिलंच गाणं सोशल मीडियावर वायरल झालंय. या गाण्यात दीपिकासोबत राणीच्या भूमिकेत आणखीन एक अभिनेत्री दिसतेय... तिच्याबद्दल लोकांची उत्सुकता वाढलीय. 

ही अभिनेत्री म्हणजे, अनुप्रिया गोयंका... अनुप्रिया अजूनही बॉलिवूडमध्ये नवखीचं आहे... ती या सिनेमात राजा रतन सिंह (शाहीद कपूर)च्या पहिल्या पत्नीचा म्हणजेच नागमतीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अनुप्रिया या अगोदर मिंत्रा या वेबसाईटच्या एका वादग्रस्त जाहिरातीत दिसली होती... तसंच तिनं वरूण धवन आणि जॉन अब्राहमच्या 'ढिशुम'मध्येही एक छोटी भूमिका निभावली होती. 

दरम्यान, या सिनेमातील दीपिका सगळ्यांनाच आवडतेय... खुद्द दिग्दर्शकही तिच्या कामावर बेहद्द खुश आहेत... यासाठीच त्यांनी तिला तिच्या आवडता पद्मावतीचा लेहंगाच तिला भेट दिलाय.