जीव मुठीत घेवून का पळाली Rupali Ganguly,अनुपमा फेम अभिनेत्रीसोबत घडलेली धक्कादायक घटना

पण रुपालीसोबत एक अशी घटना घडली जी अभिनेत्री कधीही विसरू शकत नाही.

Updated: Sep 29, 2022, 06:00 PM IST
जीव मुठीत घेवून का पळाली Rupali Ganguly,अनुपमा फेम अभिनेत्रीसोबत घडलेली धक्कादायक घटना title=

Rupali Ganguly:अनुपमा' मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगूलीने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेनंतर रुपालीच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी वाढ झाली, एवढंच नाही तर, मालिकाचा टीआरपी देखील कायम टॉपला असतो. मालिकेचं यश पाहता अभिनेत्रीला सर्वच स्तरातून प्रेम मिळत आहे. पण रुपालीसोबत एक अशी घटना घडली जी अभिनेत्री कधीही विसरू शकत नाही. (anupama actress rupali ganguly shares her experience of her accident when she was stuck at road)

रुपालीसोबत घडलेली ती धक्कादायक घटना

2018 साली जेव्हा रुपालीच्या गाडीचा अपघात झाला होता, तेव्हा अभिनेत्रीसोबत मुलगा देखील होता. रुपाली मुलाला एका ठिकाणी सोडायला जात होती. तेव्हा रुपालीची गाडी एका बाईलला धडकली. अपघात फार मोठा नव्हता. समोरच्या व्यक्तीच्या बाईकला देखील स्क्रॅच आली नव्हती. ते दोघे बाईकवरुन पडले देखील नव्हते. दरम्यान, सिंग्नल पार करताना रुपालीचा पाय ब्रेकवरुन सरकला, तेव्हा मुलगा मागच्या सीटवरून पुढे झुकला आणि तो रुपालीचा फोन हिसकावत होता

अपघातानंतर बाईकवर बसलेले दोघेही लगेचच खाली उतरले. त्यापैकी एकाने रूपाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती आणि दुसरा तिच्या कारची काच फोडायला पाहत होता. रुपालीने त्यांची विनवणीही मागितली, पण ते दोघेही ऐकत नव्हते आणि ज्या व्यक्तीने खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला त्याने पुन्हा विंडस्क्रीन तोडले. त्यानंतर रूपा तिथून निघून गेली आणि दोघांविरोधात एफआयआर दाखल केली. त्यावेळी रुपालीला दुखापत झाली होती. तिच्या हातातून रक्त येत होते आणि तिच्या गालावरही खुणा होत्या.

रुपालीने या प्रकरणी अनेक ट्विट देखील केले होते आणि मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी आभारही मानले होते. अपघाताच्या वेळी केवळ महिलांनीच मदत केली, असे त्यांनी सांगितले होते. पण कोणीही मदतीला आले नाही.