मुंबई : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांमध्ये सतत नवीन चेहऱ्यांना ब्रेक देत असतात . 2021 मध्ये, डी कंपनी या चित्रपटात, राम गोपाल यांनी OTT वर नवीन चेहऱ्यांसह मुंबईच्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सुरुवातीच्या दिवसांची कथा प्रदर्शित केली.
डी कंपनीत मोठा ब्रेक
प्रियांका चोप्राची बहीण मन्नारा चोप्रासोबत 'हाल ए दिल ब्रोकन नोट्स' हा चित्रपटही तिने केला आहे. मन्नारा चोप्रा ही प्रियांका चोप्राच्या मावशीची मुलगी आहे. अंशू मूळची मथुराची आहे मात्र आग्रा येथून इंजिनीअरिंग मध्ये ग्रॅजुएशन घेतल्यानंतर मुंबईत आली आणि तिला राम गोपाल वर्मा यांच्या डी कंपनीमध्ये मोठा ब्रेक मिळाला. हाल ए दिल ब्रोकन नोट्स ही अशीच एक लव्हस्टोरी आहे, ज्यात रिलेशनशिपमधील कटुता नंतरची परिस्थिती दाखवण्यात आली होती.
या चित्रपटात डॉनच्या बहिणीची हसीना पारकरची भूमिका साकारून अभिनेत्री अंशू राजपूत चर्चेत आली होती. ती पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडिया हँडलवर बोल्ड सिझलिंग फोटोंसह सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. टॉवेलमध्ये गुंडाळलेले अंशू राजपूतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलीकडेच, तिने तिचे हे फोटो शेअर केले आहेत आणि चाहते त्याच्यावर सतत प्रतिक्रिया देत आहेत.
रामूसोबत काम करताना अंशू म्हणाली की, ते स्वतःमध्ये एका शैक्षणिक संस्थेसारखे आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या भूमिकेसाठी तिला अनेक गोष्टींचे बारकावे समजावून सांगण्यात आले आणि ही भूमिका चांगलीच समोर आली. कोरोना कालावधीमुळे 2021 मध्ये D कंपनी Spark OTT वर सिरीज म्हणून प्रसिद्ध झाली.
बोल्ड टॉवेल सेल्फी
अंशू राजपूत 2023 मध्ये तिच्या आगामी प्रोडेक्टसह बॉलिवूडमध्ये ठसा उमटवेल अशी अपेक्षा आहे. पण सध्या ती तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या सिझलिंग टॉवेलमधील सेल्फीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोंमध्ये, ती टॉवेल गुंडाळलेली दिसत आहे, तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.