Ankita Lokhande होणार आई? पतीकडून अखेर सत्य समोर

आलियानंतर अंकिता लोखंडे होणार आई? अभिनेत्रीच्या पतीकडून अखेर सत्य समोर  

Updated: Jul 2, 2022, 10:13 AM IST
Ankita Lokhande होणार आई? पतीकडून अखेर सत्य समोर title=

मुंबई :  अभिनेत्रा अंकिता लोखंडेने बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली. मोठ्या थाटात दोघांनी लग्न केलं. अंकिता आणि विकीच्या लग्नात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अंकिताच्या लग्नानंतर अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. लग्नानंतर अद्यापही फोटोंची चर्चा सुरू असताना अंकितच्या आयुष्यातील मोठ्या गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  नुकताच मुंबईत IIA अवॉर्ड 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यात अंकिता पती विकी जैनसोबत पोहोचली होती.

यादरम्यान आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीबाबत अंकिताला विचारण्यात आलं. एवढंच नाही तर यावेळी पापाराझींनी अंकिताला तिच्या गरोदरपणाबद्दल प्रश्नही विचारले. यावर विकीने उत्तर दिलं. विकीचं उत्तर ऐकून खुद्द अर्चना देखील थक्क झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुरस्कार सोहळ्यादरम्यान आलिया आणि रणबीर बद्दल विचारण्यात आल्यानंतर अंकिताने दोघांना शुभेच्छा दिल्या. त्यानंरत पापाराझींनी अंकिताला त्यांच्या बाळाबद्दल विचारलं. यावर विकी म्हणाला आम्ही देखील रांगेत आहोत.

विकीने उत्तर देताचं अंकिता पतीकडे आश्चर्याने पाहू लागली. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे गेल्या वर्षी 14 डिसेंबर रोजी लग्न झालं. दोघांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. अलीकडेच या अभिनेत्रीने तिच्या घरात प्रवेश केला. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.