अंकिता लोखंडेच्या लग्नातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट लीक

कोणती आहे ती महत्त्वाची गोष्ट?  

Updated: Dec 4, 2021, 03:01 PM IST
अंकिता लोखंडेच्या लग्नातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट लीक title=

मुंबई : सध्या झगमगत्या विश्वात लग्नाचे वारे वाहू लागले आहे. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखाच्या विवाहानंतर आता अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री अर्चना लोखंडे बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत नव्या आयुष्याची सुरूवात करण्यासाठी सज्ज झाली आहे. अर्चनाच्या लग्नाच्या विधी देखील सुरू झाल्या आहेत. 

अर्चना आणि विकीने त्यांच्या विधी दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अर्चना फार सुंदर दिसत आहे. सर्वत्र त्यांच्या फोटोंची चर्चा रंगत असताना अर्चना आणि विकीच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट लीक झाली आहे.

अर्चना आणि विकीच्या लग्नाची पत्रिका लीक झाली आहे. फोटोंनंतर सर्वत्र त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेची चर्चा आहे. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नपत्रिकेचे आता वाटप सुरू झाले आहे. लग्नाची पत्रिका अभिनेत्री श्रद्धा आर्यला देण्यात आली आहे. 

श्रद्धा आर्यने चाहत्यांसोबत अंकिताच्या पत्रिकेची एक झलक शेअर केली आहे. छोट्या पडद्यापासून सुरुवात करणारी ही अभिनेत्री आता खऱ्या जीवनात 'पवित्र रिश्ता' बांधण्यास सज्ज झाली आहे हे पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.