अंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेमात

 

Updated: Jan 17, 2019, 08:27 PM IST
अंकिता  लोखंडे पुन्हा एकदा प्रेमात title=

 

मुंबई : राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अंकिता लोखंडे हिने कबूल केलं की तिला परत एकदा प्रेम झालं आहे. मुंबई मिररच्या रिर्पाटनुसार तिनं सांगितलं की बिलासपूरमध्ये राहणारे व्यावसायिक विकी जैन याच्याबरोबर ती रिलेशनशिपमध्ये आहे. यापूर्वी अंकिता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता या मालिकेतून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली. सुशांत आणि अंकिता यांची मैत्री पवित्र रिश्ताच्या सेटवर झाली. नंतर त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि छोट्या पडद्यावरची ही जोडी खूप चर्चेत आली. चाहत्यांना वाटत होतं की अंकिता आणि सुशांत लग्न करतील. मात्र त्याचं नात फार काळ टिकू शकल नाही.

६ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहूनही २०१६ मध्ये त्याचं ब्रेकअप झालं. अंकिताची पहिली मालिका पवित्र रिश्तामधून तिने अनेकांच्या मनात घर केलं. मालिका संपून इतके वर्ष झाले असले तरीही तिच्या चाहत्यानां तिला वेगवेगळया भूमिकेत पाहायचं होतं.‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ मध्ये तिने झलकारी बाईची भूमिका साकारली आहे. तिला दरम्यानच्या काळात अनेक ऑफर देखील आल्या. बॉलिवूडमध्ये तिने आता पदार्पण केलं आहे.

बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखातीत तिला तिच्या लग्नाबद्ल विचारल्या गेलं तर तिने म्हटलं की तिला तिच्या करिअरवर आता लक्ष केंद्रीत करायचं आहे. लग्नाबद्ल काही ठरल्यास नक्की सांगणार आणि लग्नाला बोलवणारही असं देखील तिनं म्हटलं आहे. तिला जेव्हा विक्की जैन बद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की, 'विकी स्वभावाने खूप चांगला आहे.' विकी जैन बॉक्स क्रिकेट लिगमधील मुंबई टीमचा सहमालक आहे. संध्या अंकिता आणि विकी रिलेशनशिपमध्ये असण्याची चर्चा जोरदार सुरु आहे.