'ही' अभिनेत्री बीग बॉसच्या १५व्या सिनझनमध्ये बाळासोबत जाणार

काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या अनिता हसनंदानी आणि रोहितचा मुलगा आरव आर्कषणाचा विषय ठरत आहे.

Updated: Mar 15, 2021, 05:43 PM IST
'ही' अभिनेत्री बीग बॉसच्या १५व्या सिनझनमध्ये बाळासोबत जाणार title=

मुंबई : सिद्धार्थ शुक्ला बहुतेकदा शहनाज गिलशी असलेल्या मैत्रीमुळे कायम चर्चेत असतो, मात्र यावेळी चर्चेचं कारण काही वेगळं आहे. यावेळी सिद्धार्थ शहनाज गिलची चर्चा नाही. ही चर्चा जरा वेगळी आहे. सिद्धार्थचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ एका नव्या मित्राबरोबर दिसला आहे. सिद्धार्थ शुक्लाचा हा नवीन मित्र कोण आहे? तर सिद्धार्थचा नवा मित्र इतर कोणी नाही तर अनिता हसनंदानीचा पती रोहित रेड्डी आहे.

अनिता हसनंदानीचा पती रोहित रेड्डीने सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तो आणि सिद्धार्थ शुक्ला आपले मसल्स दाखवताना दिसत आहेत. प्रथम रोहित रेड्डी आपले मसल्स दाखवतो आहे. यानंतर, सिद्धार्थ आपले मसल्स दाखवतो, जे पाहून रोहितला धक्का बसतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rohit Reddy (@rohitreddygoa)

या व्हिडीओवर अनिता हसनंदानीने कमेंन्ट केली आहे. जी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तिनं लिहिले की, मी बिग बॉसचा पुढचा सीझन माझं बाळ आरवसोबत खेळणार आहे. रोहित रेड्डी बाय. अशी कमेंन्ट अनिताने या व्हिडीओवर केली आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जन्मलेल्या अनिता आणि रोहितचा मुलगा आरव आर्कषणाचा विषय ठरत आहे. सिद्धार्थ शुक्लाचा हा मजेशीर व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओवर बर्‍याच कमेंन्ट चाहते करत आहेत. एक लाखाहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.

सिद्धार्थ शुक्ला हा टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. चाहत्यांनी सिद्धार्थ शुक्लाच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलं आहे. बिग बॉस 13 सिझनचा सिद्धार्थ विजेता ठरला होता. या शो दरम्यान त्याने शहनाज गिलशी मैत्री केली. जी मैत्री शो संपल्यानंतरही चर्चेत आहे. दोघेही बर्‍याचदा एकमेकांसोबत दिसतात.

सिद्धार्थ शुक्ला अखेर बिग बॉस १३व्या सिझनचा विजेता ठरला होता. याशिवाय तो अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येसुद्धा दिसला, त्यापैकी दोन म्युझिक व्हिडीओ शहनाज  गिलसोबत तो दिसला. त्याचबरोबर तो लवकरच एकता कपूरच्या वेब सिरीज 'ब्रोकन बट ब्युटीफुल 2' मध्ये दिसणार आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हि सिरीज येण्याआधीच बरीच चर्चा रंगली असून शोच्या सेटवरील फोटो खूप व्हायरल झाले आहेत.