'Animal' मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर, पाहा अभिनेत्रीचा लूक

रश्मिका मंदान्नानेपूर्वी 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.

Updated: Sep 23, 2023, 09:45 PM IST
'Animal' मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर, पाहा अभिनेत्रीचा लूक title=

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरच्या आगामी 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या सिनेमाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकतंच या चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आलं आहेत. साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदान्ना लवकरच बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. दरम्यान, आता 'एनिमल'मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे. याशिवाय चित्रपटातील रश्मिकाच्या पात्रावरही पडदा उठला आहे.

'अ‍ॅनिमल'मधील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक समोर आला आहे
काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये रश्मिका मंदान्ना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूरसोबत हिल्समध्ये शूटिंग करताना दिसली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रणबीर आणि रश्मिका एका चित्रपटात दिसणार आहेत, ज्याचं नाव 'अॅनिमल' आहे. आता या सिनेमातील रश्मिका मंदान्नाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे.

शनिवारी रश्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'अॅनिमल' मधून तिच्या लूकची झलक दाखवली. रश्मिकाने या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ''गीतांजलीला भेटा''. अशाप्रकारे, दाक्षिणात्य अभिनेत्रीने अॅनिमलमधील तिच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव काय असणार आहे याचीही माहिती दिली आहे.

या पोस्टरमध्ये, लाल आणि पांढर्‍या कॉम्बिनेशनच्या या साडीमध्ये रश्मिका मंदान्ना आपल्या साधेपणाने सर्वांची मने जिंकत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. रश्मिका मंदान्नाचा एनिमल चित्रपटातील लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'अॅनिमल'चा टीझर लवकरच रिलीज होणार आहे
रश्मिका मंदान्नानेपूर्वी 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील रणबीर कपूर आणि अनिल कपूरचे लूक समोर आले आहेत. या चित्रपटाचा टीझरही लवकरच प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचा टीझर २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रदर्शित होणार आहे.