सोनम कपूरच्या लग्नासाठी असा सजवण्यात आला अनिल कपूरचा बंगला...

अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. 

Updated: Apr 28, 2018, 02:49 PM IST
सोनम कपूरच्या लग्नासाठी असा सजवण्यात आला अनिल कपूरचा बंगला... title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. त्यातच लग्नासाठी सुरु असलेल्या जबरदस्त तयारी पाहायला मिळत आहे. याबद्दल कपूर परिवाराकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण अनिल कपूरच्या बंगाल्याची सजावट पाहता या चर्चेला दुजोरा मिळत आहे. अनिल कपूरच्या घराची सजावट पाहता बंगला झगमगाटात न्हाहून निघाल्यसारखा भासतो. त्याचबरोबर सोनम कपूरचा लहान भाऊ हर्षवर्धन कपूरही घरात पाहुण्यांचे स्वागत करताना दिसला. करण जोहर, मोहित मारवाह पत्नी अंतरा मोतीवाल, फराह खान यांसारखे स्टार्संनी अनिल कपूरच्या घरी उपस्थिती लावली.

sonam kapoor wedding

विवाहाच्या तयारीत घेतला हा महत्त्वाचा निर्णय

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या परिवाराने आमंत्रण प्रत्रिका न पाठवता ई इनव्हिटेशन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कागद वाया जावू नयेत म्हणून पर्यावरण पूरक निर्णय घेण्यात आला आहे. सोनमच्या संगीत कार्यक्रमाची कोरिओग्राफी फराह खान करणार आहे. या कार्यक्रमात जान्हवी कपूर आई श्रीदेवीच्या गाण्यावर नृत्य सादर करणार आहे. तर सोनम, अर्जून कपूर, रणवीर सिंगसोबत अनिल कपूरच्या माय नेम इज लखन वर ताल धरणार आहे.

मुंबईत लग्न दिल्लीत रिसेप्शन

सोनम बॉयफ्रेंड आनंद आहुजाला खूप वर्षांपासून डेट करत आहे. आनंद आहुजा, दिल्लीतील एक बिजनेसमॅन आहे. सोनम आणि आनंदचा विवाह मुंबई ७-८ मे ला होणार आहे. मुंबईत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न झाल्यानंतर दिल्लीत ग्रॅंड रिसेप्शन देण्यात येणार आहे.