तब्बल १९ वर्षानंतर माधुरीसोबत काम केल्यानंतर अनिल कपूर म्हणतात...

एकेकाळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या चर्चा जोरावर होत्या

Updated: Jan 23, 2019, 10:41 AM IST
तब्बल १९ वर्षानंतर माधुरीसोबत काम केल्यानंतर अनिल कपूर म्हणतात...  title=

मुंबई : इंद्र कुमार दिग्दर्शित आगामी सिनेमा 'टोटल धमाल'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या सिनेमात संपूर्ण स्टारकास्ट खरोखरच धम्माल करताना दिसतेय. या सिनेमात अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी, ऐश गुप्ता, जॉनी लिवर, बोमन इरानी आणि संजय मिश्रा अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे. हा सिनेमा खरोखरच स्पेशल ठरतोय तो अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या फॅन्ससाठी... कारण, तब्बल १९ वर्षानंतर हे दोघे एकाच सिनेमात दिसणार आहेत. 

एकेकाळी अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या चर्चा जोरावर होत्या. परंतु, आता पुन्हा एकदा आपली जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, म्हणून अनिल कपूरही भावूक झालेत. 'इतक्या वर्षानंतर मी माधुरी आणि इंद्र कुमार यांच्यासोबत एकत्र आलोय. आमचं एकत्रित येणं, व्यावसायिकरित्या चांगलं राहिलंच... पण भावनात्मक पातळीवरही ते चांगलंच राहीलं' 

माधुरी दीक्षितही इतक्या वर्षानंतर अनिल कपूर यांच्यासोबत काम करून खुश आहे. 'अनिल कधीही बदलू शकणार नाही. तो तेव्हापासून आत्तापर्यंत तसाच आहे. या सिनेमात काम करून मजा आली. संपूर्ण सिनेमानं सकारात्मकता आणि आनंदच दिला' 

उल्लेखनीय म्हणजे, नुकतीच अनिल कपूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. आपल्याला नरेंद्र मोदींनी ते मुख्यमंत्री असल्यापासून भेटायची इच्छा होती, अशीही प्रतिक्रिया अनिल यांनी यानंतर व्यक्त केली होती. 

'टोटल धमाल' हा सिनेमा २२ फेब्रुवारी रोजी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.