Sunita Kapoor बायकोच्या वाढदिवशी अनिल कपूर म्हणाला, आम्ही ट्रेनच्या थर्ड क्लास ते लोकल बस...

अनिल कपूरने पत्नीसोबत फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Mar 25, 2021, 09:26 PM IST
Sunita Kapoor बायकोच्या वाढदिवशी अनिल कपूर म्हणाला, आम्ही ट्रेनच्या थर्ड क्लास ते लोकल बस... title=

मुंबई : बॉलिवूडचा हिट आणि फिट अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूर यांची जोडी चाहत्यांची लाडकी जोडी आहे. सुनीता लाईमलाईटपासून थोडं दूरच राहणं पसंत करते. आज सुनीता कपूर यांचा वाढदिवस आहे. या खास दिवशी केवळ अनिलच किंवा सोनम नाही तर सोनमसह तिचे कुटुंबीयदेखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. यावेळी अनिल कपूरने पत्नीसोबत कधीही न पाहिलेले गेलेले फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

त्याचबरोबर अनिलने या निमित्ताने भावनिक पोस्टदेखील लिहिली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी संघर्षाच्या दिवसांपासून आतापर्यंत दोघांनी कसा प्रवास केला हे सांगितलं आहे. त्या कठीण प्रसंगामध्ये देखील नेहमी या दोघांनी एकमेकांना पाठिंबा दिला आहे. सोनम कपूरनेही आपल्या आईबरोबरचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अनिल कपूर यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरुन पत्नी सुनीता कपूरसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. याचबरोबर अनिल यांनी शेअर केलेल्या फोटोंना दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधुन घेत आहे. ''माझ्या आयुष्यातील खुप सारं प्रेम तुझ्यासाठी... ट्रेनच्या थर्ड क्लास कंपार्टमेंट्स ते लोकल बस, काळी- पिवळी टॅक्सी प्रवास करणे ते इकोनॉमी ते बिजनेस आणि यानंतर फर्स्ट क्लासमध्ये उडण्यापर्यंत... दक्षिणेला कराईकुडी सांरख्या छोट्या गावतल्या छोट्या-छोट्या हॉटेल ते लेह-लद्दाख मधील तंबूपर्यंत... आपण आपल्या चेहऱ्यावरील हास्य आणि हृद्यातील प्रेमाने या सगळ्याचा आनंद घेतला आहे

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूरनं पुढे लिहलय की, ''यामागंच हेच कारण आहे ज्यामुळे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो... तु माझ्या हास्याचं कारण आहेस आणि तुझ्यामुळेच आपल्या संसाराची गाडी ईतक्या गोडीनं-सुखानं पुढे गेली आहे. माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी मला पार्टनर भेटली यासाठी मी प्रत्येक दिवशी आणि नेहमीच मी धन्य झालो आहे..हॅपी बर्थडे... नेहमीच खूपसार प्रेम''
 
तर दुसरीकडे सोनम कपूरनेही आई सुनीत कपूरसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  - 'मला आशा आहे आपली भेट लवकरच होईल आणि मी तुला घट्ट मिठी मारेन''