मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. अनिल कपूरने आज जे तो आहे त्याचं श्रेय एका मराठमोळ्या अभिनेत्रीला दिलं आहे. पहिल्यांदाच त्याने अशाप्रकारे जाहीरपणे असा खुलासा केलाय.
अनिल कपूरने त्याच्या यशाचं श्रेय अभिनेत्री पद्मीनी कोल्हापूरे हिला दिलंय. तो म्हणाला की, जर पद्मीनी ‘वो सात दिन’ मध्ये तिने त्याच्यासोबत काम केलं नसतं तर तो आज ज्या उंचीवर आहे, तो तिथे नसता.
Happy B'Day to my first leading lady #PadminiKolhapure!! It's because she agreed to do #WohSaathDin that I am where I am today! pic.twitter.com/gIhb1qCd5r
— Anil Kapoor (@AnilKapoor) November 1, 2017
बुधवारी अभिनेती पद्मिनी कोल्हापूरे हिचा वाढदिवस. यानिमित्ताने त्याने १९८३ साली आलेल्या ‘वो सात दिन’ सिनेमाचा फोटो ट्विटरवर शेअर केलाय. त्यासोबतच त्याने हा खुलासाही केलाय. तो म्हणाला की, मी आज जे काही आहे ते पद्मिनीमुळे आहे. कारण तिने ‘वो सात दिन’ सिनेमाला होकार दिला.
‘वो सात दिन’ या सिनेमाची कथा डॉ. आनंदच्या अवतीभोवती फिरते. त्याला माहिती होतं की, नवविवाहीत तरूणी दुस-यावर प्रेम करते. हा सिनेमा चांगलाच पसंत केला गेला होता.