Anil Kapoor Birthday: वयाच्या 66 व्या वर्षीही अनिल कपूर यांच्या 'झक्कास' फिटनेसचं रहस्य काय?

Anil Kapoor Birthday: आपल्या झक्कास अभिनयानं गेली 40 वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor Age) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

Updated: Dec 24, 2022, 05:35 PM IST
Anil Kapoor Birthday: वयाच्या 66 व्या वर्षीही अनिल कपूर यांच्या 'झक्कास' फिटनेसचं रहस्य काय?  title=
anil kapoor fitness

Anil Kapoor Birthday: आपल्या झक्कास अभिनयानं गेली 40 वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor Age) यांचा आज 66 वा वाढदिवस आहे. त्यांच्या चाहत्यांनी आज त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूर हिनं देखील सोशल मीडिया (Anil Kapoor Social media) आपल्या वडिलांना जुने फॅमिली फोटो आणि पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वयाच्या 66 व्या वर्षीही अनिल कपूर हे फिट आणि तंदूरूस्त आहे. वयाची साठी ओलांडली असली तरी त्यांचा फीटनेस पाहून भल्याभल्यांना घाम फूटतो. तरूणांनाही लाजवेल अशी शरीरयष्टी आणि एनर्जी पाहून आजही अनेक तरूणी त्यांच्यावर फिदा आहेत. त्यांचं हास्य आणि सतत आनंदी (Anil Kapoor Smile) राहण्याचा स्वभावही अनेकांना आवडतो. परंतु त्यांच्या या फिटनेसचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते कायमच उत्सुक असतात. (Anil kapoor birthday what the secret behind his fitness age gym diet)

अनिल कपूर हे आजतागायत नित्यनियमानं व्यायाम करतात. त्यांच्या डाएटमध्येही कायमचं हेल्थी गोष्टींचा समावेश असतो. अनिल कपूर हे योगा करतात. ते नेहमीच योगा करताना दिसले आहे. त्यांचे असे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत. ज्यात ते योगाचं महत्त्व लोकांना पटवून देतात. फिटनेस फ्रिक म्हणूनही त्यांची ओळख लोकांना आहे. त्यांचे शर्टलेस फोटो पाहून आपल्याल त्याचा अंदाज येईल की ते जीमही करतात. त्यांना जीमचं फार जास्त महत्त्व आहे. त्यामुळे दोन तास तरी ते आपला वेळ जीममध्ये घालवतात. 

त्यांचा आनंदी स्वभावही त्यांच्या फिटनेसमागचं (Fitness videos anil kapoor) रहस्य आहे. धावणं, चालणं, सायकलिंग, स्विमिंग, फिरणं, कमी खाणं, पौष्टिक खाणं आणि योगा अशा गोष्टींचा त्यांच्या जीवनशैलीमध्ये समावेश असतोच असतो. त्यांनी अनेकदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की त्यांना सायकलिंगची फार आवडं आहे. ते अनेकदा शुटिंगमधून वेळ काढतं ते मोकळा वेळ सायकलिंगसाठी देतात त्याचबरोबर ते बॅडमिंटनही खेळतात. 

हालखीचं बालपण 

अनिल कपूर याचं बालपण खूप हालाखीत गेलं. त्यांचे वडील हे पृथ्वीराज थिएटरमध्ये काम करायचे. पैसे नसल्यानं ते त्यांच्या संपुर्ण कुटुंबियासमवेत आणि भावंडांबरोबर एकाच खोलीत झोपायचे. त्यांचे वडील पुढे प्रसिद्ध निर्मातेही झाले. अनिल कपूर यांनी सुरूवातीला स्पॉट बॉयचीही नोकरी केली. पहिल्या 210 रूपयांच्या पगारापासून ते आता 134 कोटींचे मालक आहेत. 

काय आहे त्यांचा फिटनेस मंत्रा? 

समोर आलेल्या माहितीनुसार अनिल कपूर उठल्यावर केळं खातात. ते चहा - कॉफी पितं नाहीत तर त्यांच्या आहारात स्ट्रॉबेरी मिल्कशेक नाहीतर एपल ज्यूस असतो. ते ब्रोकोल, मसूर आणि ब्राऊन राईस खातात. त्याचसोबत ते कधीही जंक फूड खात नाहीत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अनिल कपूर यांचा बेटा, तेजाब आणि मिस्टर इंडिया हे चित्रपट सुपरहिट ठरले होते. आजही ते ओटीटी, चित्रपटांतून काम करतात. त्यांचा जुग जुग जिओ (Anil Kapoor latest film) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.