'जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही...' अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय?

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. 

Updated: Jan 12, 2024, 09:51 PM IST
'जे त्याला आवडतं, ते मला आवडत नाही...' अनन्या पांडेला नेमकं काय म्हणायचंय? title=

Ananya Panday Possessive : गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत अभिनेत्री अनन्या पांडेच्या लव्ह लाईफची चर्चा सुरु आहे. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोललं जात आहे. ते दोघेही अनेकदा एकत्र फिरताना, कॉफी डेटवर, एअरपोर्टवर, सिनेमागृहात एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी एकत्र एका पार्टीत हजेरी लावली. नुकतंच अनन्याने एका कार्यक्रमादरम्यान आदित्यसोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी तिने तिच्या आवडी-निवडीबद्दल सांगितले. 

अनन्या पांडेने नुकतंच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' मध्ये हजेरी लावली. यावेळी तिने आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली. यानंतर नुकतंच तिने 'इन्संटट बॉलिवूड' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी तिला एक गर्लफ्रेंड म्हणून अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुला आवडतात आणि ज्या तुला अजिबात आवडत नाहीत? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फारच मनमोकळेपणाने उत्तर दिले. 

अनन्या पांडे नेमकं काय म्हणाली?

यावेळी अनन्या म्हणाली, "एक गर्लफ्रेंड म्हणून मी खूपच पझेसिव्ह आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी कधी अशा गोष्टी करते ज्या करणं मला अजिबात आवडत नाहीत. पण माझ्या पार्टनरला त्या आवडतात, म्हणून मी त्या करते. पण या दोन्हीही गोष्ट फार चांगल्या आहेत, असं मला वाटतं."

"या दोन्हीही गोष्टी तुम्ही चांगल्या म्हणूनही घेऊ शकता. कारण मी ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्याला जपते. मी कायम त्याच्यासाठी त्याला हवं तिथे हजर असते", असे अनन्याने सांगितले. 

आणखी वाचा :  'खर्च उचलावा लागतो म्हणजे काय...', अंकिता लोखंडेच्या सासूवर रश्मी देसाईचा संताप, म्हणाली 'ती रस्त्यावर...'

दरम्यान अनन्या पांडेची मुख्य भूमिका असलेला खो गए हम कहा हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. त्यात ती अभिनेता आदर्श गौरव आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्याबरोबर झळकली होती. त्यानंतर आता लवकरच ती कॉल मी बे या टेलिव्हिजन सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यात तिच्यासोबत वरुण धवन आणि वीर दास हे दिसणार आहेत. त्याबरोबरच ती 'कंट्रोल', 'बॅटल थाई सीड्स', 'दरबदर', 'शंकरा', 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर' आणि 'रन फॉर यंग' या चित्रपटातही झळकणार आहे.