PM मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमृता फडणवीस यांचे खास गुजराती भाषेत गाणं; तुम्ही एकलतं का?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खास गाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Sep 17, 2023, 10:22 PM IST
PM मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने अमृता फडणवीस यांचे खास गुजराती भाषेत गाणं; तुम्ही एकलतं का?  title=

Amruta Fadnavis New Song : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा  73 वा वाढदिवस (PM Modi Birthday) आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी खास गाण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे गुजराती भाषेत त्यांनी हे गाणं गायल आहे. अमृता फडणवीस यांचे हे गाण सोशल मिडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी गुजराती गाण्याची व्हिडिओ क्लिक शेअर केली आहे. हे गाणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांनी गुजराती भाषेतील हे गाणं गायले आहे.  2 मिनीट 11 सेकंदाचे हे गाण आहे.

आधुनिक भारताचे शिल्पकार आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचलेली कविता ‘रमता राम अकेला’ सादर करताना विलक्षण अनुभव आला. एकटं चालण्यातही वेगळीच आध्यात्मिकता आहे. यातून वेगळाच आनंद मिळतो. देश सेवेतच समाधान आहे असं कॅप्शन अमृता फडणवीस यांनी हा व्हिडिओ शेअर करताना दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना एका गीता द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींची प्रतिमा निर्णायक नेतृत्व आणि वैश्विक नेतृत्वाची असल्याचंही या गातीतून अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. या गाण्याला प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रुपकुमार राठोड यांनी संगीत दिलं आहे.

अमृता फडणवीस यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

अमृता फडणवीस या नेहमी पंतप्रधान मोदींचे कौतुक करत असतात. आपले दोन राष्ट्रपिता आहेत आधी महात्मा गांधी आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी असं विधान अमृता फडणवीस यांनी केले होते.  नुकतंच अमृता फडणवीसांनी न्यूयॅार्कच्या ‘भारत’ महोत्सवात हजेरी लावली.  या कार्यक्रमात त्यांनी देशभक्तीपर आणि इतर गाणी सादर केली. त्यांच्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड आहे. त्या नेहमी अनेक विषयांवर गाणी सादर करत असतात.