Amruta Fadnavis यांची बॉलिवूडमध्ये सुरेल एन्ट्री; Video Viral

कलाविश्वात Amruta Fadnavis याचं एक पाऊल पुढे... बॉलिवूडमधील दमदार एन्ट्री सध्या चर्चेत  

Updated: Oct 13, 2022, 09:02 AM IST
Amruta Fadnavis यांची बॉलिवूडमध्ये सुरेल एन्ट्री; Video Viral title=

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) कायम चर्चेत असतात. कधी ट्विट तर कधी एखाद्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात असतात  (Amruta Fadnavis social media) . पण आता त्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण आहे संगीत... संगीतावर असलेल्या प्रेमामुळे अमृता यांना बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळाली. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, जी सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. love you loktantra 

आता अमृता फडणवीस यांनी कोणत्या म्यूझीक अल्बमसाठी (Music album) नाही बॉलिवूड सिनेमातील एका गाण्यासाठी आवाज दिला आहे. लव्ह यू लोकतंत्र’ (love you loktantra) या सिनेमातील एक गाणं त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं आहे. ‘धडका दिल’ (dhadak adil) असे त्यांनी गायलेल्या गाण्याचे बोल आहेत. 

गाण्यासाठी अमृता यांना बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक शानची साथ मिळाली. सध्या हे रोमाँटिक गाणं (Romantic song) चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. नव्या गाण्याबाबत अमृता फडणवीसांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

येत्या 14 ऑक्टोबरला ‘लव्ह यू लोकतंत्र’ सिनेमा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर गाण्याचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. सध्या त्यांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.