अंगात 100 ताप, अशक्तपणा आणि... लग्नानंतर 'अशा' अवस्थेतही केले अभिनेत्रीनं नाटकाचे प्रयोग

Amruta Deshmukh: अभिनेत्री अमृता देशमुख हिची बरीच चर्चा आहे. नुकतंच तिचं लग्नही पार पडलं आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ हे जोरात व्हायरल झाले होते. लग्नानंतर ती आजारी होती परंतु तरीही तिनं नाटकाचे प्रयोग केले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 29, 2023, 05:38 PM IST
अंगात 100 ताप, अशक्तपणा आणि... लग्नानंतर 'अशा' अवस्थेतही केले अभिनेत्रीनं नाटकाचे प्रयोग title=
Amruta Deshmukh performs shaw of niyam va ati lagu after getting ill

Amruta Deshmukh:  काही दिवसांपुर्वी चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा होती. 18 नोव्हेंबरला त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. त्यांच्या अफेअरचीही बरीच चर्चा रंगलेली होती. बिग बॉसपासून त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली होती. 'बिग बॉस मराठी 4' मध्ये ते दोघंही स्पर्धक म्हणून होते. तेव्हापासून त्यांच्या लव्हस्टोरीला सुरूवात झाली होती. तेव्हा त्यांची बरीच चर्चा होती. याचवर्षी त्यांनी त्यांचा साखरपुडा उरकला आणि मग त्यांचा विवाहसोहळाही पार पडला आहे. दोघंही अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. त्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये फारच बिझी आहेत. त्यामुळे लगेचच त्यांनी आपल्या कामालाही सुरूवात केली आहे. 

परंतु लग्नाच्या काही दिवसांनंततरच अभिनेत्री अमृता देशमुख ही आजारी पडली आहे. त्या अवस्थेतही तिनं नाटकाचे प्रयोग केले आहेत. त्यामुळे तिची बरीच चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी अमृता देशमुखची आई वैशाली देशमुख यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यांनी याविषयीचा खुलासा केला आहे की आजारी असतानाही तिनं नाटकाचे प्रयोग केले आहेत.

यावेळी त्यांनी लिहिलं आहे की, ''The show must go on… ! प्रत्येक कलाकारासाठी हे ब्रीदवाक्य असतं…पण, प्रत्यक्षात हे किती कठीण असतं हे ज्याच्यावर ती वेळ येते त्यालाच ठाऊक…अंगात 100 ताप…दोन वाक्य बोललं की येणारा खोकला… तापामुळे आलेला अशक्तपणा… पुरेशी न झालेली झोप.. आणि त्यात प्रवास या अशा परिस्थितीत अमृताने 'नियम व अटी लागू' या नाटकाचे तीन दिवसांत सलग चार प्रयोग केले. त्यातला पहिला प्रयोग बोरिवली आणि नंतरचे पुण्यात…प्रसाद, आम्ही सगळे आणि डॉक्टर तिच्या पाठीशी होतोच पण ज्या जिद्दीने तिने हे प्रयोग केले त्याला तोड नाही…कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात सुध्दा आले असणार तिचे आजारपण…पण त्यांचा मिळणारा जिवंत प्रतिसाद हीच तिची खरी willpower …! अमृता तुझा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो! रंगभूमी पुन्हा एकदा गाजवण्यासाठी लवकरात लवकर बरी हो!''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसते आहे. यावेळी सगळेजणं तिचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे तिची बरीच चर्चा आहे. अनेकजणं तिला आराम करण्याचा सल्ला देत आहेत तर अनेक जण तिच्या या धाडसाचे कौतुक करत आहेत.