सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर नाही कारण....

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची आता तिच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 11, 2018, 09:40 PM IST
सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर नाही कारण....  title=

मुंबई : बॅडमिंटन स्टार सायना नेहवालच्या बायोपिकची आता तिच्या चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

अमोल गुप्ते या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरला घेतल होते. मात्र श्रद्धा कपूरचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालत नसल्याचं समोर आलं. आणि निर्मात्यांनी श्रद्धा कपूरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी आता श्रद्धा कपूरच्या जागी दीपिका पदुकोणला घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

दीपिकाचे वडिल प्रकाश पदुकोण हे स्वतः लोकप्रिय बॅडमिंटन खेळाडू आहेत. तसेच दीपिका देखील राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता दीपिकाला या बायोपिकसाठी निवडण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. श्रद्धा कपूरचे सिनेमे ओके जानू, हसीना पारकर बॉक्स ऑफिसवर अगदी वाईट पद्धतीने पडले. श्रद्धाच्या या ग्राफला बघता निर्माते चिंतेत आले आहेत. त्यामुले एवढ्या मोठ्या बायोपिकमध्ये श्रद्धाला घेणं चुकीचं ठरेल असं त्यांना वाटत आहे. 

श्रद्धा या सिनेमाची अगदी जोरात तयारी करत होती. एवढंच नाही तर श्रद्धाने सायना आणि तिचे कोच गोपीचंद यांच्यासोबत भरपूर मेहनत देखील केली होती. श्रद्धाने प्रॅक्टिस सेशनचे फोटो देखील शेअर केले होते. मात्र या सिनेमातून काढल्यानंतर श्रद्धाने हे फोटो इंस्टाग्रामवरून काढून टाकले आहेत.