अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली का?

लग्नाच्या 49 वर्षांनंतर अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, तुम्ही पाहिली का त्यांच्या लग्नाची पत्रिका?   

Updated: Feb 26, 2022, 12:42 PM IST
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका तुम्ही पाहिली का?  title=

मुंबई :  महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक तर प्रत्येक वेळा होत असतं. बॉलिवूडमध्ये त्यांनी कठोर मेहनत घेत एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुरूवातीच्या काळात त्यांचे सिनेमे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास असर्मथ ठरले. पण ते खचले नाही. त्यांनी मागे वळून कधीही पाहिलं नाही. तेव्हा त्यांची साथ दिली जया बच्चन यांनी. दोघांच्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात राज्य केलं. 

फक्त एक सहकलाकार म्हणून नाही तर उत्तम जोडीदार म्हणून देखील त्यांची चर्चा होते. अखेर 3 जून 1973 रोजी लग्नंबधनात अडकले. अमिताभ आणि जया याचं लग्न जया बच्चन यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्न झालं. 

बिग बी त्या काळी भाड्याच्या घरात राहत असे. अशावेळी त्यांनी जया यांच्या मैत्रिणीच्या घरी लग्न करण्याच्या निर्णय घेतला. जया जेव्हा वधुच्या रुपात आल्या तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेच खिळून राहिल्या. त्यांच्या लग्नाची पत्रिका सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

खूपच घाईत जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाचं आयोजन झालं. या दोघांनी अतिशय साधेपद्धतीने लग्न केलं. या लग्नाला अतिशय जवळची मंडळी आणि नातेवाईक असते. हा सोहळा अतिशय साधेपणाने झालं आहे. 3 जून 1973 रोजी लग्नंबधनात अडकले आहेत. 

'जंजीर' सिनेमाचं यश आणि अमिताभ-जया यांच्या लग्नानंतर हे दोघं हनीमूनकरता लंडनमध्ये गेले होते. यासोबतच सिनेमाच्या सक्सेस सेलिब्रेशनरता लंडनमध्ये गेला होता. जीवनात आलेल्या सगळ्या चांगल्या वाईट प्रसंगात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे कायमच एकत्र राहिले आहेत.