...जेव्हा रणबीरला पाहून बिग बी ही गोंधळले

बॉलीवूडचे असे काही आगामी सिनेमे ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट. या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारलीये.

Updated: Feb 24, 2018, 01:37 PM IST
...जेव्हा रणबीरला पाहून बिग बी ही गोंधळले title=

मुंबई : बॉलीवूडचे असे काही आगामी सिनेमे ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे संजय दत्तच्या जीवनावरील चित्रपट. या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकारलीये.

या सिनेमातील रणबीरचा लूक अनेकदा व्हायरल झालाय. या लूकमध्ये रणबीर हुबेहूब संजय दत्तसारखा दिसतोय. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा टीझर पाहिला आणि तो पाहिल्यानंतर रणबीरचे तोंडभरुन कौतुकही केले. इतकंच नव्हे तर या सिनेमात ते रणबीरला ओळखूही शकले नाहीत.

या सिनेमात रणबीरव्यतिरिक्त अनुष्का शर्मा,  सोनम कपूर, दिया मिर्झा, मनीषा कोईराला, परेश रावल आणि विक्की कौशल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलेय. तर विधु विनोद चोप्रा यांनी निर्मिती केलीये.

हा सिनेमा २९ जूनला रिलीज होतोय. या सिनेमाशिवाय रणबीर ब्रम्हास्त्र सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.