मुंबई : बॉलिवूडकर आणि मराठी प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड'. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात दिसणार आहेत. नागराज मंजुळेने 'नाळ'नंतर बॉलिवूडमध्ये उडी घेतली आहे. त्याच्या या सिनेमाकरता प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
'झुंड' या सिनेमाच शुटिंग नागपूरमध्ये सुरू आहे. या संदर्भात बिग बी कायम अपेडट करत असतात. या सिनेमाच्या निमित्ताने बिग बी खेड्यापाड्यातील जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत. हा सिनेमा त्यांना मातीशी जोडून राहण्यास मदत करणार आहे.
या सिनेमाबाबत आणि त्या संपूर्ण प्रवासाबद्दल बिग बी कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपडेट देतच असतात. ‘बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का’ असं लिहित बच्चन यांनी फोटो शेअर केले. तर दुसरीकडे चित्रपटासाठी त्यांनी बसमधूनही प्रवास केला. याची माहिती बिग बींनी दिली आहे.
T 3052 -
बड़े दिनों के बाद गाँव की खटिया का आनंद लूटा ; और बैल गाड़ी की सवारी का pic.twitter.com/GD6RcUxzuf— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2019
T 3052 - .. they asked me when was the last time you travelled by bus .. I said : 'this afternoon' .. ! but good to remember those College and job hunting days of bus and tram travel .. pic.twitter.com/sEcfgfPiHs
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 8, 2019
आतापर्यंत बिग बींनी अनेक बिग बजेट सिनेमांमध्ये काम केलं आहे. या सिनेमांकरता त्यांनी परदेशात जाऊन शुटिंग देखील केलं आहे. पण खूप दिवसांनी बिग बी शुटिंग दरम्यान भरपूर आनंद लुटत असल्याचं त्यांच्या या फोटोंमधून स्पष्ट होत आहे.
'झुंड' या सिनेमात अमिताभ बच्चन एका निवृत्त खेळाडू शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एका झोपडपट्टीत ते फुलबॉलची सुरुवात करतात.भूषण कुमार या सिनेमाचे निर्माते असून नागराज मंजुळे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. याआधी ही अमिताभ बच्चन यांनी शिक्षकाची भूमिका केली आहे. त्यांचे अनेक सिनेमे यशस्वी देखील ठरले.